PSY 271 | मी आणि माझे सामाजिक वर्तन | YCMOU BATY PSY271 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.A. |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 169 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
मी आणि माझे सामाजिक वर्तन' (PSY271) ह्यात आपण सामाजिक मानसशास्त्राची ओळख करून घेणार आहोत सामाजिक वर्तन निश्चितपणे कशाला म्हणावयाचे, आपले सर्वच वर्तन सामाजिक असते का, सामाजिक वर्तनाचा अभ्यास करण्याचे प्रयोजन कोणते, असे अनेक प्रश्न ह्या संदर्भात उद्भवतात.
मूल जन्मल्यानंतर लगेचच त्याच्या सामाजिकीकरणाला सुरुवात होते. त्याचे पुढाल सर्व जीवनच समाजामध्ये व्यजीत होते. समाजातील इतर व्यक्ती, समूह रीतीरिवाज यांचा परिणाम व्यक्तीच्या वर्तनावर होत असतो. त्या अनुषंगाने व्यक्ती वर्तन करते. अशा वर्तनालाच 'सामाजिक वर्तन' म्हणतात. या सामाजिक वर्तनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो, त्याला 'सामाजिक मानसशास्त्र' असे म्हणतात.
मानवी भावना, प्रेरणा, विचार, अध्ययन ह्या सर्व मानसिक प्रक्रियांवर आधारित असे जे वर्तन होते ते शेवटी समाजाच्या संदर्भातच होत असते. ह्या दृष्टीने जवळजवळ सर्वच मानवी वर्तन हे सामाजिक वर्तनच असते असे म्हणता येईल. आजच्या काळात इतर अनेक अभ्यासक्षेत्रांप्रमाणे सामाजिक मानसशास्त्रातही खूपच प्रगती होत आहे. नवनवीन प्रश्न हाताळले जाऊन त्यावर संशोधने होत आहेत. सामाजिक मानसशास्त्रात सिद्ध झालेल्या तत्त्वांचा सामाजिक समस्या सोडविण्यासाठी उपयोग होईल का, ह्या दृष्टीनेही विचार होत आहे.
पहिल्या पुस्तकात 'सामाजिक मानसशास्त्र' ह्या विषयाचा परिचय करून दिलेला आहे. तसेच 'सामाजिकीकरण' प्रक्रियेबद्दल सविस्तर विवेचन केलेले आहे. शिवाय 'सामाजिक प्रेरणा', 'उपलब्धी प्रेरणा' आणि 'संलग्नता प्रेरणा' यांबद्दल चर्चा केलेली आहे. 'भाषा आणि संप्रेषण प्रक्रिया' ह्यांची ओळख दुसऱ्या पुस्तकात करून दिलेली आहे. त्याबरोबरच सामाजिक वर्तनावर परिणाम करणाऱ्या 'अभिवृत्ती' ह्या संकल्पनेची ओळख करून दिलेली आहे.
आंतरव्यक्तिक संबंध व आकर्षण, परार्थवृत्ती व समाजाभिमुख वर्तन, सहकार्य, व स्पर्धा, हिंसाचार, इत्यादी प्रकारच्या सामाजिक वर्तनाची माहितीदेखील या पुस्तकात दिलेली आहे. तिसऱ्या पुस्तकात वर्तनावर परिणाम करणारा घटक ह्या दृष्टीने 'समूहांचा अभ्यास' केलेला आहे. वर्तनावर होणाऱ्या 'सामाजिक प्रभावां'चे विवेचन केलेले आहे. असा हा 'मी आणि माझे सामाजिक वर्तन' या शास्त्रशुद्ध अभ्यासामुळे सामाजिक वर्तनाविषयीची तुमची जाण निश्चितच परिपक्व होईल. तसेच स्वतःचे व इतरांचे सामाजिक वर्तन समजण्यासाठी तुम्हांला त्याचा उपयोग होईल.
अभ्यासक्रम
पुस्तक १ : सामाजिक मानसशास्त्र, सामाजीकरण आणि सामाजिक प्रेरणा
घटक ०१ : सामाजिक मानसशास्त्र व्याख्या, स्वरूप व व्याप्ती
घटक ०२ : सामाजिक वर्तनाच्या तीन पातळया
घटक ०३ : सामाजिक मानसशास्त्राचे उपयोजन
घटक ०४ : सामाजिक मानसशास्त्रातील अभ्यास पद्धती
घटक ०५ : सामाजीकरणाचे स्वरूप व प्रक्रिया
घटक ०६ : नैतिकतेचा विकास
घटक ०७ : स्व-संकल्पना
घटक ०८ : प्रेरणेची व्याख्या, स्वरूप आणि प्रकार
घटक ०९ : विविध सामाजिक प्रेरणा
घटक १० : संबंधन प्रेरणा आणि सिद्धी प्रेरणा
पुस्तक २ : भाषा व संप्रेषण, अभिवृत्ती आणि सामाजिक वर्तन
घटक ११ : भाषा व संप्रेषण
घटक १२ : संप्रेषण प्रक्रिया, आंतरवैयक्तिक संप्रेषण आणि शाब्दिक व अशाब्दिक संप्रेषण
घटक १३ : औपचारिक संप्रेषण जाळे
घटक १४ : अभिवृत्ती : स्वरूप व परिमिती
घटक १५ : अभिवृत्ती निर्मिती
घटक १६ : अभिवृत्ती परिवर्तन
घटक १७ : अभिवृत्ती मापन
घटक १८ : आंतरव्यक्तिक संबंध, सामाजिक तुलना आणि आंतरव्यक्तिक आकर्षण
घटक १९ : परार्थवृत्ती व समाजाभिमुख वर्तन
घटक २० : सहकार्य आणि स्पर्धा
घटक २१ : सामाजिक हिंसाचार, आक्रमकता व दहशतवाद
पुस्तक ३ : समूह, सामाजिक प्रभाव आणि नेतृत्व
घटक २२ : समूह-स्वरूप, वैशिष्टचे, उद्दिष्टे
घटक २३ : समूह-निर्मिती व प्रकार
घटक २४ : समूह निर्वर्तन, समूह नीतिधैर्य आणि समूह एकात्मकता
घटक २५ : सामाजिक सुलभता
घटक २६ : सामाजिक भूमिका, स्थान व दर्जा, सामाजिक विभेदीकरण
घटक २७ : सामाजिक प्रभाव (१) प्रक्रिया व गटाचे दडपण
घटक २८ : सामाजिक प्रभाव (२) सामाजिक अनुचलन
घटक २९ : नेतृत्वः स्वरूप आणि नेत्याची कार्ये
घटक ३० : नेत्यांचे प्रकार व नेत्यांची गुणवैशिष्ट्ये

- --
- --
varsha 06-Feb-2024 03:56 am
Akshay Vernekar 12-Jun-2022 11:08 am
mayur bhoite 06-Nov-2021 04:49 pm
Mahesh Borse 24-Aug-2021 08:16 am
Dange Sangam 08-Aug-2021 01:57 pm