MAR 252 | प्रबोधनपर साहित्य | YCMOU BATY MAR 252 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.A. |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 125 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
'प्रबोधनपर साहित्य' ह्या अभ्यासक्रमाचा जाणीवपूर्वक समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राला आणि मराठी साहित्याला प्रबोधनाची फार मोठी परंपरा आहे. मराठी साहित्याचा उदयच मुळी प्रबोधनाच्या चळवळीतून झालेला आहे. महानुभाव आणि संतांच्या वाङ्मयापासून आजच्या दलित साहित्यापर्यंतच्या वाङ्मयीन वाटचालीला प्रबोधनाच्या चळवळीचा भक्कम आधार आहे. मराठी लेखकांनी प्रबोधनाच्या चळवळीपासून प्रेरणा घेतली आहे.
मध्ययुगातील संतांची चळवळ असो, आधुनिक काळातील समाजसुधारणेच्या चळवळी असो किंवा स्वातंत्र्योत्तर काळातील विविध सामाजिक चळवळींचा उदय असो, ह्याला महाराष्ट्राची पुरोगामी परंपराच कारणीभूत असल्याचे दिसेल. संतांनी आध्यात्मिक समतेची लढाई तीव्र केली.
प्रबोधनाची संकल्पना आणि स्वरूप जाणून घेणे, महाराष्ट्रातल्या तमाम प्रबोधनकारांच्या विचारांची ओळख करून घेणे, त्यांनी समाज सुधारण्यासाठी वापरलेल्या माध्यमांचा परिचय करून घेणे आणि ह्या प्रबोधनाच्या पुढील वाटचालीला बळ देण्यासाठी नवे विचारमंथन जागृत ठेवणे ह्यासाठी ह्या अभ्यासक्रमाची नितांत गरज आहे.
'प्रबोधनपर साहित्य' ह्या अभ्यासक्रमात एकूण तीन पुस्तके आहेत. पहिल्या पुस्तकात प्रबोधनाची तात्त्विक मीमांसा केलेली आहे. प्रबोधनाच्या चळवळींचा सूक्ष्म अभ्यास आपण ह्या पुस्तकाच्या आधारे करणार आहोत. दुसऱ्या पुस्तकात मराठीतल्या प्रबोधनपर वैचारिक साहित्याचा अभ्यास आपणास करावयाचा आहे. प्रबोधनाची चळवळ ज्या विचारवंतांनी चालविली, त्यांच्या वैचारिक साहित्याची ओळख ह्या पुर नकामुळे होणार आहे. प्रबोधनपर वैचारिक साहित्याची वैशिष्टचे स्वरूप आणि संकल्पना ह्या पुस्तकामुळे समजून घेता येईल. तिसऱ्या पुस्तकात 'प्रबोधनपर मराठी ललित साहित्य' ह्याचा अभ्यास आपण करणार आहोत. मराठी साहित्याने प्रबोधनाचा विचार कसा व्यक्त केला आहे हे जाणून घेण्यासाठी ह्या पुस्तकाची मदत होणार आहे. मराठीतल्या उत्कृष्ट साहित्याच्या आधारे प्रबोधनपर ललित वाङ्मयाचे स्वरूप आणि वैशिष्टचे स्पष्ट करण्याचा येथे प्रयत्न करण्यात आलेला आहे.
अभ्यासक्रम
पुस्तक १ : प्रबोधनपर साहित्यः स्वरूप व संकल्पना
घटक १ : प्रबोधन म्हणजे काय?
घटक २ : प्रबोधनः आधारतत्त्वे आणि मूल्ये
घटक ३ : भारतीय प्रबोधनाची वाटचाल
घटक ४ : प्रबोधनाची उपकरणे
घटक ५ : प्रबोधनाची संप्रेषण-तंत्रे
घटक ६ : समाजप्रबोधनाच्या विविध चळवळी
घटक ७ : प्रबोधनाचे मूल्यमापन व भवितव्य
पुस्तक २ : मराठी वैचारिक साहित्य
घटक १ : वैचारिक साहित्य: संकल्पना आणि स्वरूप
घटक २ : स्वातंत्र्याची संकल्पना आणि वैयक्तिक साहित्य
घटक ३ : समतेची संकल्पना आणि वैचारिक साहित्य
घटक ४ : बंधुत्व, भगिनीभाव आणि वैचारिक साहित्य
घटक ५ : न्याय आणि वैचारिक साहित्य
घटक ६ : नैतिकता, सहिष्णुता आणि वैचारिक साहित्य
घटक ७ : वैचारिक साहित्याची फलश्रुती
पुस्तक ३ : मराठी ललित साहित्य
घटक १ : ललित साहित्याची संकल्पना
घटक २ : स्वातंत्र्य आणि ललित साहित्य
घटक ३ : समता आणि ललित साहित्य
घटक ४ : न्याय आणि मराठी साहित्य
घटक ५ : बंधुता, सहिष्णुता आणि ललित साहित्य
घटक ६ : नैतिकता, सहिष्णुता आणि मराठी साहित्य
घटक ७ : ललित साहित्यातील प्रबोधनवादी विचाराचे मूल्यमापन
'प्रबोधनपर साहित्य' ह्या अभ्यासक्रमातील हे पहिले पुस्तक आहे. ह्या पुस्तकात प्रबोधनपर विचाराची तात्त्विक मांडणी केलेली आहे. प्रबोधनपर साहित्याची संकल्पना, भूमिका, स्वरूप आणि वैशिष्टचे ह्यांचा परिचय ह्या पुस्तकात करून दिला आहे. त्याचबरोबर आपल्या देशात झालेल्या समाजसुधारणेच्या चळवळी, समाजसुधारकांचे विचार आणि तत्कालीन सामाजिक परिस्थिती ह्यांचाही ऊहापोह इथे करण्यात आला आहे.
विषम व्यवस्थेकडून नव्या समाजरचनेकडे झालेला जो प्रवास आहे, त्या प्रवासाचा इतिहास आणि तपशील समजून घेण्यासाठी ह्या पुस्तकाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. राजा राममोहन रॉयपासून ते आजच्या नरेंद्र दाभोळकर ह्यांच्यापर्यंत ही समाजसुधारणेची चळवळ सतत प्रवाहित राहिलेली आहे. ह्या चळवळींच्या स्थितिगतीचा अभ्यास केल्याशिवाय मराठी वाङ्मयाची वाटचाल समजून घेता येणार नाही. मराठी साहित्याचा विशेष अभ्यास करणाऱ्यांसाठी ह्या पुस्तकाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.
प्रबोधनाचा विचार, प्रबोधनाची चळवळ, प्रबोधनकार व समाज ह्यांचा अनुबंध ह्या पुस्तकामुळे स्पष्ट होणार आहे. चळवळी आणि लोकांचा संबंध प्रस्थापित करणारी माध्यमं आणि तंत्र ह्यांचाही सखोल अभ्यास येथे करणार आहोत. अनेक वेळा प्रबोधनाची चळवळ गतिरुद्ध झाली आहे, प्रबोधनाचा विचार संपन्न आहे, अशी निराशाजनक भावना व्यक्त होत असते. त्यामुळे प्रबोधन चळवळीचे मूल्यमापन करणेही महत्त्वाचे होते.
पुस्तक दुसरे : प्रबोधनपर वैचारिक वाङ्मय हे दुसरे पुस्तक आहे.
'प्रबोधनपर साहित्य' ह्या अभ्यासक्रमातील हे दुसरे पुस्तक आहे. प्रबोधनपर वैचारिक साहित्याचा समावेश ह्या पुस्तकात केलेला आहे. खरे तर, प्रबोधनाच्या कालखंडातील वैचारिक साहित्यानेच प्रबोधनाचा विचार मांडलेला आहे. वैचारिक साहित्यामध्ये समाजपरिवर्तनाची ताकद असते. परिवर्तनवादी साहित्य हे परिवर्तनवादी चळवळींना वैचारिक रसद पुरविण्याचे कार्य करत असते.
प्रबोधनाच्या काळातील वैचारिक लेखन हे विविध विषयांनी नटलेले आहे. ह्या लेखनात सामाजिक परिवर्तनाचा विचार परखडपणे प्रकट झाला आहे. जुन्या चालीरीतींवर कडाडून हल्ला चढवत असताना हे विचारवंत कोठेही डगमगले नाहीत. आपली प्रामाणिक भूमिका त्यांनी प्रांजलपणे लोकांपुढे मांडली आहे.
प्रबोधन काळातील वैचारिक लेखनामुळे हिंदू समाज प्रगत व सुधारणावादी व्हायला जशी मदत झाली आहे, तशी स्त्री-शूद्रांच्या आणि दलितांच्या चळवळींनाही ह्यामुळे बळ मिळाले नाही. प्रबोधनपर वैचारिक साहित्याचे मराठी साहित्य आणि समाजावर एक प्रकारचे ऋण झाले आहे.
'प्रबोधनपर साहित्य' ह्या अभ्यासक्रमातील प्रबोधनपर ललित वाङ्मय हे तिसरे पुस्तक आहे. साहित्याचा आणि प्रबोधनाचा अनुबंध विद्यार्थ्यांना कळावा म्हणून ह्या पुस्तकाची रचना केलेली आहे. कवी आणि कलावंत हे समाजाचे वाङ्मयीन प्रतिनिधी असतात. समाजाच्या विकासाच्या वाटचालीत साहित्याचे योगदान महत्त्वाचे असते.
'रामायण' आणि 'महाभारत' ही महाकाव्ये आहेत. तत्कालीन समाज व्यवस्थेला सुदृढ करण्याचे काम ह्या ग्रंथांनी केलेले आहे. रामायणातील 'राम' आणि महाभारतातील 'धर्म' ह्यांचा आदर्श आजही भारतीय समाज मनावर प्रभाव गाजवताना दिसतो. 'अंकल रॉम्स केबिन' सारख्या एका कादंबरीने अमेरिकेतील संपूर्ण श्वेत समाजाला हादरे दिले. 'डॉल्स हाऊस' ह्या नाटकातील नायिका नोरा घर सोडून जाताना जो प्रसंग दाखवला आहे, त्या प्रसंगाने संपूर्ण युरोपची समाज व्यवस्था हादरली होती.
साहित्याच्या माध्यमातून लेखक, कवी, नाटककार आणि विचारवंत समाज सुधारण्याचा विचार मांडत असतात. त्यातूनच 'जीवनवादी कलेचा' विचार प्रसूत झाला. कला जीवनासाठी आहे. कलेमुळे समाजाची धारणा होते. कलावंतांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाज परिवर्तनाचे कार्य केले पाहिजे हा विचार ही त्यातून पुढे आला आहे.
मराठी ललित साहित्यामध्ये 'जीवनवादी वाङ्मय' विपुल प्रमाणात लिहिले गेले आहे. कवी केशवसुतांपासून ते कवी कुसुमाग्रजांपर्यंत हा विचार आपणास पाहावयास मिळेल. संत ज्ञानेश्वरांचे 'पसायदान' तर सामाजिक परिवर्तनाच्या आशयाचे प्रतिकच आहे.
मराठी ललित साहित्य आणि प्रबोधन ह्याचा अभ्यास एकत्रितपणे करता यावा म्हणून ह्या ग्रंथाची योजना केली असून संत ज्ञानेश्वरांपासून ते आजचे दलित कवी अरुण भावे ह्यांच्यापर्यंतच्या साहित्याचा मागोवा ह्या पुस्तकात घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना 'परिवर्तनाचा विचार आणि ललित साहित्य' ह्याचा अनुबंध ह्या पुस्तकामुळे कळून येईल. त्यांची सामाजिक आस्था वृद्धिंगत होईल, असे वाटते.

- --
- --
Anna Wargada 21-Jul-2021 11:21 am