POL 311 | लोकप्रशासन | YCMOU BATY POL311 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.A. |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 226 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
शासन जे धोरण ठरवते त्याच्या कार्यवाहीसाठी जो सेवक वर्ग, नियमित वेतन घेणारा वर्ग असतो त्याच्या श्रेणिबद्ध रचनेला लोकप्रशासन (POL311) म्हणतात. कल्याणकारी राज्य ह्या संकल्पनेमुळे शासनाचे कार्यक्षेत्र विस्तृत झाले आहे. लोकप्रशासनाचा व्यवहार हा जरी खाजगी प्रशासनापेक्षा वेगळा असला तरीही त्यांच्या कार्यपद्धतीत व संघटनेच्या तत्त्वात साम्य आढळल्याचे दिसते.
ह्यातील पहिल्या पुस्तकातून आपण लोकप्रशासन म्हणजे काय? ह्याचा अर्थ व व्याख्या ह्यांचे अध्ययन करणार आहोत. तसेच खाजगी प्रशासन व लोकप्रशासन ह्यांतील साम्य आणि भेद जाणून घेणार आहोत.
दुसऱ्या पुस्तकातून आपण प्रशासकीय यंत्रणा जाणून घेणार आहोत. राज्याने ठरविलेली धोरणे राबविण्यासाठीची जी यंत्रणा असते, अशा यंत्रणेचा अभ्यास येथे करणार आहोत. ह्यासाठी आपण प्रथम मनुष्यबळ प्रशासनातून नोकरभरती व बढतीच्या पद्धती, लोकसेवा आयोग व नोकरभरती मंडळाचे स्वरूप, प्रशिक्षणाचे प्रकार, शासकीय नोकरांची राजकीय तटस्थता व बांधिलकी, शासकीय नोकरांसाठीची आचारसंहिता ह्यांचे अध्ययन करणार आहोत. वित्तीय प्रशासनात आपण अंदाजपत्रकाचा अर्थ व त्याचे महत्त्व, वित्तीय समित्या आणि सार्वजनिक लेखा परीक्षण व महालेखा परीक्षण ह्यांचे संदर्भ घेणार आहोत. प्रदत्त विधीकरणाचा अर्थ, स्वरूप व त्यातील फायदे-तोटे हेही अभ्यासणार आहोत. शेवटी आपण माहितीच्या अधिकारासह लोकपाल व लोकायुक्त संस्था, पारदर्शी प्रशासन व प्रशासकीय उत्तरदायित्व ह्यांचे अध्ययन करणार आहोत.
तिसऱ्या पुस्तकातून आपण स्थानिक प्रशासनाचा अभ्यास हा ग्रामीण व शहरी संदर्भात करणार आहोत. ह्यातून आपण पंचायती राज्याचे स्वरूप, त्याचे अधिनियम अभ्यासणार आहोत; तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद ह्यांच्यासह नगरपरिषदा व महापालिका ह्यांची रचना व कार्यक्षेत्र जाणून घेऊन अधिकारी व पदाधिकारी ह्यांच्या परस्परसंबंधाचे स्वरूप अभ्यासणार आहोत.
अभ्यासक्रम
पुस्तक पहिले : लोकप्रशासन : स्वरूप व व्याप्ती
घटक १ : लोकप्रशासन व्याख्या, स्वरूप व व्याप्ती
घटक २ : खाजगी प्रशासन व लोकप्रशासन : साम्य-भेद
घटक ३ : प्रशासकीय सेवकांची संघटनात्मक संरचना
घटक ४ : संघटनेची तत्त्वे व मूलाधार
घटक ५ : सार्वजनिक महामंडळे अधिकार व कार्यक्षेत्रे
पुस्तक दुसरे : प्रशासकीय यंत्रणा
घटक १ : मनुष्यबळ प्रशासन
घटक २ : वित्तीय प्रशासन
घटक ३ : प्रदत्त विधीकरण अर्थ, स्वरूप, फायदे-तोटे
घटक ४ : लोकपाल व लोकायुक्त संस्था, पारदर्शी प्रशासन व प्रशासकीय उत्तरदायित्व
घटक ५ : माहितीचा अधिकार
पुस्तक तिसरे : स्थानिक प्रशासन : ग्रामीण व नागरी
घटक १ : पंचायतीराज संकल्पना व स्वरूप
घटक २ : पंचायतीराज अधिनियमांची ओळख
घटक ३ : ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासन
घटक ४ : पंचायत समिती व जिल्हा परिषद
घटक ५ : नगर परिषदा व महापलिका

- --
- --
Rajkumar Gangaram Bothikar 17-Jun-2022 01:14 pm
rahul patil 30-Jul-2021 03:31 pm