ECO 276 | सार्वजनिक वित्तव्यवहार | YCMOU BATY ECO276 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.A. |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 153 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
सार्वजनिक वित्तव्यवहार (ECO276) म्हणजे सार्वजनिक संस्थांच्या उत्पन्न मिळविण्याच्या व ते खर्च करण्याच्या पद्धतींशी निगडित असणारे म्हणजे राजस्व वा सार्वजनिक वित्तव्यवहार होय.
पूर्वीच्या काळी भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वयंचलित असे. व्यक्तीच्या खाजगी हित साधण्याच्या प्रयत्नातून सामाजिक हित् आपोआप साध्य होते अशी समजूत होती. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत 'अदृश्य हात' कार्यरत असतो. सरकारने आर्थिक क्षेत्रात हस्तक्षेप करू नये कारण त्यामुळे स्वयंचलित व्यवस्थेत अडथळे निर्माण होतात असे मानले जात असे. परंतु साधनसामग्रीचा पुरेपूर वापर, पूर्ण रोजगार साध्य करणे, आर्थिक विषमता कमी करणे, पायाभूत सोयी सुविधांचा विकास करणे, सामाजिक उपयोगितेच्या वस्तू व सेवांची निर्मिती करणे यासाठी सरकारचा आर्थिक क्षेत्रात हस्तक्षेप आवश्यक ठरतो.
सरकार विविध योजनांच्या अंमलबजावणीतून, समाजोपयोगी उद्योगांच्या स्थापनेतून शिक्षण, आरोग्य, वाहतूक, संदेशवहन, इत्यादी सेवांचा पुरवठा करून सामाजिक कल्याण साध्य करण्याचा प्रयत्न करते. तसा प्रयत्न व्यापक समाजहित लक्षात घेऊन सरकारला करावा लागतो. कारण खाजगी उद्योजकांना एवढी मोठी गुंतवणूक करणे शक्य नसते. शिवाय खाजगी उद्योजकांचा मुख्य उद्देश नफा कमविणे हा असतो. त्यामुळे आर्थिक क्षेत्रात हस्तक्षेप करणे, खाजगी उत्पादकांच्या बरोबरीने किंबहुना त्याहून जास्त गुंतवणूक करून देशातील उत्पादन, उत्पन्न निर्मितीस चालना देणे हे सरकारचे कार्य ठरते. अर्थातच यासाठी सरकारला उत्पन्न मिळवावे लागते. हे उत्पन्न विविध कर, शुल्क, दंड, सार्वजनिक उपक्रमांपासून मिळणारे उत्पन्न याद्वारे सरकार प्राप्त करते, काहींच्या उत्पन्नावर, वस्तू व सेवांवर कर लावण्यात येतात.
अभ्यासक्रम
पुस्तक १ : सार्वजनिक उत्पन्न
घटक १ : विषय-प्रवेश
घटक २ : सार्वजनिक उत्पन्नास
पुस्तक २ : सार्वजनिक खर्च
घटक १ : सार्वजनिक खर्च
घटक २ : सार्वजनिक कर्ज
पुस्तक ३ : राजकोषीय व्यवस्था व अर्थसंकल्पीय धोरण
घटक १ : एकावयी (Unitory) राज्यव्यबहार
घटक २ : संघीय राजकोषीय व्यवस्था
घटक ३ : स्थानिक राजकोषीय व्यवस्था
घटक ४ : युद्ध परिस्थितीतील राजकोषीय व्यवस्था
घटक ५ : अर्थसंकल्पाचे प्रकार
घटक ६ : तुटीच्या संकल्पना
घटक ७ : तुटीच्या अर्थभरण्याचे परिणाम
घटक ८ : अर्थसंकल्पीय धोरण

- --
- --
Pankaj Topre 06-Mar-2025 02:38 am
umesh nora 14-May-2022 02:08 pm