MAR 253 | बालसाहित्य | YCMOU BATY MAR 253 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.A. |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 148 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
बालसाहित्य म्हणजे मानवी व्यवहार व मानवेतर सृष्टीविषयी मुलांची जिज्ञासापूर्ती करणारे, कल्पनारम्य व चमत्कृतीजन्य वातावरणाने त्यांचे मनोरंजन करणारे, त्यांच्यामध्ये चांगल्या-वाईटाची जाण निर्माण करून त्यांचे व्यक्तिमत्त्व सुसंपन्न करणारे जे साहित्य ते बालसाहित्य होय.
बालसाहित्य म्हणजे बालकांसाठी निर्माण झालेले साहित्य असते; परंतु इथं ही पाठच्च पुस्तके बालकांसाठी नाहीत. बी. ए.च्या तृतीय वर्षाच्या मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना बालसाहित्य विषयाची माहिती व्हावी, बालसाहित्याबद्दल त्यांचे आकलन वाढावे, आणि बालसाहित्य लेखनाची पुढे त्यांना प्रेरणा मिळावी, अशी कल्पना आहे.
बालसाहित्याची तीन पाठ्यपुस्तके आपण तयार केली आहेत. मराठी साहित्याच्या अभ्यासात बालसाहित्य महत्त्वाचा प्रकार आहे. माणसानं आपले अनुभव दुसऱ्यास सांगणे ही मौखिक परंपरेची सुरुवात होती. वडीलधारे माणसं मुलांना अनोखे अद्भुत प्रसंगाच्या गोष्टी सांगू लागले. ही बालसाहित्याची सुरुवात आहे. पुढे लिपीचा शोध लागला. मुद्रणाची प्रगती झाली. ह्या काळात लिखित आणि मुद्रित स्वरूपाचं जे साहित्य निर्माण झालं, ते त्यात काही बालसाहित्य होतंच.
आज जगाच्या सहाशे कोटीच्या लोकसंख्येत पंधरा वर्षांच्या आतील दोनशे कोटी मुलं आहेत. या मुलांचा देश, भाषा, धर्म, जाती व वर्णव्यवस्था भिन्न असली तरी त्यांच्या विचारात आणि समजूतीत एक समानसूत्र आहे. हवामान, वेषभूषा, राहणीमान, रीतिरिवाज, भाषा, खाणंपिणं यात काहीशी भिन्नता असेलही; परंतु वर्ग आणि संप्रदायांच्या या भिंती गाडून ही मुलं माणसात कधीच भेदभाव करीत नाहीत. या मुलांवर आपण जसे संस्कार करू, तशी त्यांची सर्वांगानं वाढ होत असते. त्यांच्या उत्तम शारीरिक वाढीसाठी जशी सकस आहाराची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भावनिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी उत्तम बालसाहित्याची नितांत आवश्यकता असते.
अभ्यासक्रम
पुस्तक १ : बालसाहित्य : स्वरूप आणि वाटचाल
घटक १ : बालसाहित्याचे स्वरूप
घटक २ : बालसाहित्याचे वैशिष्ट्ये
घटक ३ : बालसाहित्याचे प्रयोजन
घटक ४ : बालमानसशास्त्र व बालसाहित्य
घटक ५ : बालसाहित्याचे प्रकार
घटक ६ : बालसाहित्याचा इतिहास
पुस्तक २ : बालकथा व बालकादंबरी
घटक ०१ : खाईन सांडगे कुडुम कुडुम !
घटक ०२ : छोटू हत्तीची गोष्ट
घटक ०३ : कावळयाची शाळा
घटक ०४ : सिंह आणि उंदीर
घटक ०५ : सशाची चतुराई
घटक ०६ : भूतदयेची मूर्ती
घटक ०७ : चिंगीचा पराक्रम
घटक ०८: उटावरचा शहाणा
घटक ०९ : शिरीषकुमार
घटक १० : दिनूचे बिल
घटक ११ : देवमाणूस
घटक १२ : स्वाभिमानी किसन
घटक १३ : माझा शाळेतला पहिला धडा
घटक १४ : सुरस
घटक १५ : चित्रकाराचा संशोधक झाला
घटक १६ : बालबहादूर फास्टर फेणे
घटक १७ : गोट्या - भाग - १, २ व ३
घटक १८ : श्यामची आई
घटक १९ : धर्माची गोष्ट
घटक २० : पाग्या
पुस्तक ३ : बालसाहित्य : कविता, नाटक व चरित्र
घटक ०१ : चला सुटी झाली
घटक ०२ : फुलपाखरू
घटक ०३ : बाहुली
घटक ०४ : माझ्या या दारातून
घटक ०५ : बागुलबोवा
घटक ०६ : उठा उठा चिऊताई
घटक ०७ : पडसे न येण्याचा मंत्र
घटक ०८ : पऱ्यांची शाळा
घटक ०९ : माझे घर
घटक १० : थुई थुई नाच माझ्या
घटक ११ : तर मग गट्टी कोणाशी ?
घटक १२ : रानात एकटेच पडलेले फूल
घटक १३ : कोल्होबाची वरात
घटक १४ : माडकं गेलं फुटून
घटक १५ : एकदा मी
घटक १६ : निम्माशिम्मा राक्षस
घटक १७ : जादूचा शंख
घटक १८ : मिशी हरवली आहे
घटक १९ : विरंगुळा
घटक २० : आई
घटक २१ : चार्ल्स रुडॉल्फ
घटक २२ : तू स्वयं दीप हो !
घटक २३ : निसर्ग आपला मित्र
घटक २४ : कुत्र्याचे जातभाई
घटक २५ : अडई आणि तिची पिल्ले
घटक २६ : युरेनिअमचे (अध्यक्षांचे) भाषण
घटक २७ : सौरऊर्जा
घटक २८ : बाजवून घ्या
आपणांस 'बालसाहित्य' या विषयांतर्गत' बालकथा व बालकांदबरी' या दोन साहित्य प्रकारांचा अभ्यास करावयाचा आहे. या आधी आपण 'लघुकथा' व' कादंबरी' हे दोन विषय अभ्यासलेले आहेतच. थोडी पात्रे, मोजके प्रसंग आणि त्यांमधून वाचकांच्या / श्रोत्यांच्या मनावर बिंबविला जाणारा एकात्म संस्कार ही कथेची प्रमुख लक्षणे आहेत. आता आपण खास मुलांसाठी लिहिलेल्या काही प्रकारांच्या बालकथांचा अभ्यास करणार आहोत.
बालसाहित्य म्हणजे सर्वसामान्यपणे सोळा वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी लिहिले जाणारे साहित्य. वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत मूल साधारणतः चार अवस्थांतून जात असते. अडीच वर्षांपर्यंतच्या मुलाला 'बालक' म्हटले जाते. ते एकदम अबोध असते. नेहमी खेळण्यात दंग असते. गोष्टीपेक्षा खेळणीच त्याला आवडत असतात. चित्रेही आवडतात. पशु- पक्ष्यांचे, सभोवतीच्या प्राण्यांचे त्याला आर्कषण असते. त्यानंतर त्याची शैशवावस्था सुरू होते. तीन ते पाच वर्षांपर्यंत 'शिशुवय', ५ ते ९ वर्षांपर्यंतचे बालवय', ९ ते १२ वर्षांपर्यंतचे 'कुमारवय', या चार वयोगटांसाठी लिहिले जाणारे ते बाल- साहित्य होय.
बाल्यावस्थेतून मूल शैशवावस्थेत येते, तेव्हा ते स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करीत असते. ते अतिशय संवेदनशील असते, त्याला नवनव्या अनुभूतींची गरज असते. ती नैसर्गिकच असते. आपल्या परिसरातील सृष्टीविषयी त्याला जबरदस्त आकर्षण असते. सभोवतीची मुले-माणसे, पशु- पक्षी, झाडे-झुडुपे, डोंगर-नद्या, गाई-गुरे, ढग-पाऊस यांविषयी त्याची जिज्ञासा वाढती असते. त्यांचे रंग-रूप, ध्वनी, गंध आणि स्पर्श यांचे ज्ञान तो आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. सभोवतीच्या मुलां-माणसांच्या, प्राण्यांच्या क्रियांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याची निरीक्षणशक्तीही वाढत जाते.
बालवयानंतर मुलांची किशोरावस्था सुरू होते. त्यांचे वय जसजसे वाढत जाते, तसतसे त्यांना समजू लागते की, आपल्या याआधीच्या कल्पनासृष्टीतले जग अवास्तव आहे, कल्पित आहे, त्यांचे मन सत्यसृष्टीत उतरू लागते. त्यांच्या विचारशक्तीचा विकास होऊ लागतो. तर्कशक्ती व बुद्धी विकसू लागते. त्यांचे बालपणीचे जग वितळू लागते. आपल्या परिसरातील घडणाऱ्या घटनांविषयी त्यांचे कुतुहल तीव्रतेने वाढू लागते. म्हणूनच ती आपला बहुतेक वेळ घराबाहेरच घालवीत असतात. आपल्या मित्रमंडळीबरोबर खेळण्यात, हिंडण्यात त्यांना विशेष आनंद मिळत असतो.
बालवयाप्रमाणे या वयातही त्यांची जिज्ञासा, अनुकरण, संग्रह, रचना, इत्यादी प्रवृत्ती कार्यरत असतातच. त्यांना निरनिराळ्या, नवनवीन गोष्टींचे ज्ञान ग्रहण करण्यात विशेष रुची असते. अनुकरण-प्रवृत्तीतून ती आपल्या आई-वडिलांच्या, भावा-बहिणींच्या, शाळेतील शिक्षक-शिक्षिकांच्या वर्तणुकीचे, त्यांच्या कार्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. आपल्या वडीलधाऱ्यांना जे आवडत नाही, ते वाईट आहे व त्यांना जे आवडते ते चांगले असते, अशी त्यांची धारणा होत जाते,
या पुस्तकात एकुण २८ घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. घटक १ ते ५ हे शिशुकवितेचे आहेत. या घटकांत एकूण पाच शिशगीतांचा परिचय करून देण्यात आलेला आहे. पहिलीच कविता कवी वा. गो. मायदेव यांची आहे. 'चला सुटी झाली' ही आहे. जुन्या काळातील, जुन्या पिढीतली ही कविता अजुनही पंच्याहत्तरीतल्या लोकांच्या जिभेवर आहे. जुन्या काळात ही कविता प्रत्येक मुलाने हावभाव करीत म्हटली आहे. मुलांच्या मनाचा ठावं घेणाऱ्यालाच अशी कविता सुचू शकते. याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
घटक १ ते ५ मध्ये पाच शिशुकविता देताना विविधता ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अधिकतेला स्थान देणे शक्य नसले तरी प्रातिनिधिकता साधलेली आहे. घटक ६ ते ९ मध्ये बालकवितेचा परिचय करून देण्यात आलेला आहे. यासाठी प्रसिद्ध कवींच्या चार कवितांची निवड केलेली आहे. कुसुमाग्रजांची 'उठा उठा चिऊताई' ही कविता खूपच अर्थपूर्ण आहे. पाखरातील ही आई असलेली चिऊताई बाळाचं नाव घेताच लगबगीने कामाला लागते. ही मुलांच्या मनाला भिडणारी, पटणारी कविता आहे. विंदा करंदीकर यांची 'पडसे न येण्याचा मंत्र', सुभाष वसेकर यांची 'पऱ्यांची शाळा', गणेश कुडे यांची 'माझे घर' या साऱ्या कविता विविध प्रकारच्या असल्या तरी मुलांना भावणाऱ्या आहेत.
घटक १० ते १५ मध्ये १२ ते १६ वयोगटातील मुलांसाठी योग्य ठरणाऱ्या कुमार कविता आहेत. यासाठी प्रतिनिधिक स्वरूपाच्या सहा कविता देण्यात आलेल्या आहेत. 'रानात एकटेच पडलेले फूल' नारायण टिळक, 'तर मग गट्टी कोणाशी ?' भा. रा. तांबे, 'थुई थुई नाच माझ्या' शांता शेळके, 'कोल्होबाची वरात' महावीर जोंधळे, 'मडकं गेलं फुटून' फ. मुं. शिंदे, आणि 'एकदा मी' दासू वैद्य अशा सहा कविता वेगवेगळ्या विषयांवर आहेत. मागील काळातील नारायण टिळक, भा. रा. तांबे व अलीकडच्या काळातील शेळके, जोंधळे, शिंदे, वैद्य यांच्या ह्या कविता आहेत. दर पिढीतली मानसिकता व भावविश्व बदलत असते. याचे प्रत्यंतर कवींच्या रचनेतही येत असते. याचा अनुभवही घेता येऊ शकतो.

- --
- --
R.M.SAYYAD 18-Aug-2021 11:48 am
Shweta Hajare 03-Aug-2021 09:20 am
Swapnil lonare 19-Jul-2021 01:00 pm