HIS 282 | भारतीय स्त्री जीवनाची वाटचाल | YCMOU BATY HIS282 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.A. |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 156 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
'भारतीय स्त्री-जीवनाची वाटचाल' (HIS 282) या अभ्यासक्रमात भारतीय स्त्रीचे जीवन प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक या कालखंडात कसे होते याचा अभ्यास करणार आहात. स्त्रियांना कौटुंबिक व सामाजिक जीवनात विविध भूमिकांतून वावरावे लागते. मुलगी, पत्नी, आई अशा विविध भूमिका तीला पार पाडाव्या लागतात. भारतीय समाजात कुटुंब व समाजजीवन या दोन्ही क्षेत्रांत स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आदर्श कुटुंबात स्त्रीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे व तीचे स्थानही महत्त्वाचे आहे. परंतु ही परिस्थिती येण्यासाठी स्त्रीला फार प्राचीन काळापासून संघर्ष करावा लागला आहे.
प्राचीन काळी स्त्रीला एका विशिष्ट मयदिपर्यंतच स्वातंत्र्य होते. आर्थिक स्वातंत्र्य देण्यात आलेले नव्हते. पितृसत्ताक कुटुंब पद्धती होती. कुटुंबात मुलाच्या जन्मास मोठे महत्त्व होते. मुलगी झाली तर तिला बाजूला सारण्यात येत असे. स्त्रियांच्या कौटुंबिक वर्तनाबाबत विविध नियम होते. विवाह व अपत्योत्पादन हीच स्त्री-जीवनाची परिपूर्णता मानली जाई. पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीला पूनर्विवाहाची परवानगी नव्हती. सती, नियोग, जोहार यांसारख्या प्रथा रूढ होत्या. विधवा स्त्रियांचे जीवन तर अधिकच हालाखीचे होते.
अभ्यासक्रम
पुस्तक पहिले : प्राचीन भारतीय स्त्री-जीवन
घटक १ : प्राचीन भारतीय स्त्री जीवन : ठळक वैशिष्ट्ये
घटक २ : पुरुषप्रधान संस्कृती व स्त्री-जीवनाची वाटचाल
घटक ३ : प्राचीन भारतीय साहित्यातील स्त्री-जीवनाचे प्रतिबिंब
घटक ४ : प्राचीन कालखंडातील स्त्री-जीवनाचा आढावा
पुस्तक दुसरे : मध्ययुगीन भारतातील स्त्री-जीवन
घटक १ : मध्ययुगातील भारतीय स्त्रीविषयक दृष्टिकोन
घटक २ : धार्मिक क्षेत्र व स्त्री-जीवन
घटक ३ : संत कवयित्रींचे योगदान
घटक ४ : १८व्या शतकातील स्त्री-जीवन व कर्तृत्ववान स्त्रिया
पुस्तक तिसरे : आधुनिक भारतातील स्त्री-जीवन
घटक १ : १९व्या शतकातील स्त्री जीवन
घटक २ : स्त्री-जीवनातील परिवर्तनवादी चळवळींची वाटचाल
घटक ३ : स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांचे योगदान
घटक ४ : स्वातंत्र्योत्तर कालखंडातील स्त्री-जीवन
मध्ययुगीन कालखंडात सामान्य कुटुंबातील स्त्रियांत अंधश्रद्धा, अज्ञान यांचा फैलाव झाला होता. केवळ उच्च वर्गातील स्त्रियांनाच शिक्षणाचा अधिकार होता. बालविवाहाची पद्धत रूढ होती. हुंडा पद्धती तर प्राचीन काळापासूनच रूढ होती. हिंदू समाजाप्रमाणे मुस्लीम समाजातील स्त्रियांनादेखील दुय्यम स्थान होते. मात्र कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मातेविषयी मोठा आदर होता. याही परिस्थितीत मध्ययुगात अनेक स्त्रियांनी आपले कर्तृत्व गाजवले. गुलबदन बेगम, गुलरूख बेगम यांनी पर्शियन भाषेत प्रावीण्य संपादन केले. जान बेगम, नुरजहाँन यांनी काव्याच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. मीराबाई, रूपमती यांनी साहित्यात आपला ठसा उमटविला. अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात संत कवियित्रींची मोठी परंपरा होऊन गेली. महदंबा, मुक्ताबाई, संत जनाबाई, कान्होपात्रा, आदींनी मोठे योगदान दिले.
आपल्या साहित्यातून समाजातील अनिष्ट प्रथा, रूढी यांच्यावर प्रहार केले. याशिवाय काही स्त्रियांनी १८ व्या शतकात आपल्या कर्तबगारीने समाजात विशिष्ट स्थान निर्माण केले. ताराबाई, अहल्याबाई होळकर, भवानी रानी आदिंची नावे सांगता येतील. मात्र कर्तबगारी, बुद्धिमत्ता, धैर्य, निश्चयीपणा हे सर्व गुण असूनही सामान्य स्त्रीला मात्र मध्ययुगात गुलामासारखेच जगावे लागले.
भारतात ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाल्यावर त्यांनी राबविलेली धोरणे व केलेल्या सुधारणा यांचे स्त्री-जीवनावरही परिणाम घडून आले. पाश्चात्त्यांच्या प्रभावामुळे स्त्री-जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. शिक्षण, जुन्या रूढींचा त्याग, स्त्री-जीवन सुधारण्यासाठी समाजसुधारकांने प्रभाव, सती प्रथा विरोध या सर्वांतून स्त्रियांनादेखील मानवी वागणूक देणे, त्यांच्या गुणांचा कर्तृत्वाचा आदर करणे ही भावना दृढ होऊ लागली.
सावित्रीबाई फुले, म. जोतिबा फुले, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, आदी स्त्रियांनी स्त्रियांच्या विविध समस्यांबाबत आवाज उठवला व स्त्रियांत जागृती घडवून आणली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांचेही योगदान मोठे आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, सौ. येसूवहिनी सावरकर, कमला नेहरू, कस्तुरबा गांधी, अरुणा असफअली, इत्यादींनी स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले.
आधुनिक काळाचा विचार करता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी कर्तृत्व गाजविले आहे. इंदिरा गांधी, कल्पना चावला, किरण बेदी, मेधा पाटकर, साधनाताई आमटे, मॅगसेसे पुरस्कारप्राप्त डॉ. सौ. आरोळे अशा अनेक स्त्रियांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपला ठसा उमटविला आहे. परंतु अद्यापही स्त्रियांच्या मुक्तीचे बरेच काम बाकी आहे. ग्रामीण स्त्रिया, आदिवासी स्त्रिया, ग्रामीण मुली यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद त्यांच्यात निर्माण करण्याची गरज आहे. याशिवाय पारंपरिक रूढी, प्रथा यांतून स्त्री जीवन मुक्त करण्याची गरज आहे. शिक्षण हेच एकमेव साधन त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. शिक्षण तळागाळापर्यंत नेण्याची गरज आहे.
तुम्हाला प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारतातील स्त्री-जीवनाविषयी माहिती होईल व प्राचीन काळापासून ते आजपर्यंतच स्त्रियांनी कशा त-हेने आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे याची माहिती होईल. स्त्री-जीवन उत्थानासाठी प्रयत्न करणे फार आवश्यक आहे व त्यातूनच खऱ्या अर्थान प्रगतिशील भारत उदयास आला असे म्हणता येईल.

- --
- --
Mithun Thorat 29-May-2024 09:33 am
umesh 23-Aug-2021 04:52 pm
DIPAK RATHOD 19-Aug-2021 02:04 pm
kamble Rajnandini 08-Aug-2021 05:22 pm