ECO 279 | ग्राहक संरक्षण | YCMOU BATY ECO279 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.A. |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 152 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
'ग्राहक संरक्षण' (ECO279) हा अभ्यासक्रम पूर्वीपासूनची ग्राहक संरक्षणाची गरज ओळखून तयार करण्यात आला आहे. ग्राहकांच्या अज्ञानाबरोबरच ग्राहकांचा असंघटितपणा हे ग्राहकांच्या शोषणाचे एक कारण आहे. आधुनिक काळात विज्ञान, तंत्रज्ञान यांतील प्रगतीमुळे उत्पादनाची पद्धती व तंत्रे सुधारली. उत्पादनाचे प्रमाण वाढले. एकाच प्रकारच्या उत्पादनात विविध उत्पादन संस्था, काही मुठभर कंपन्यांची विशिष्ट उत्पादनात वा क्षेत्रात मक्तेदारी अशी स्थिती आज अंतर्गत बाजारात आहे. विक्रीतंत्रात झालेले आमूलाग्र बदल ग्राहकांना कोणती गोष्ट हिताची आहे ते सांगत नाहीत, तर त्यांनी कोणती वस्तू घ्यावी याचाच केवळ जाहिरातीद्वारे मारा करीत असतात.
जागतिकीकरणाच्या वातावरणात देशी उत्पादनांबरोबरच परदेशी कंपन्यांची उत्पादने उपलब्ध झाली आहे. अशा वेळी तर ग्राहकांनी आपल्या हिताचे रक्षण करणे, त्याबाबत सदैव जागरूक राहणे आवश्यक ठरले आहे. उपभोगाच्या व टिकाऊ उपभोग्य वस्तूंच्या तसेच औषधे, बी-बियाणे, इत्यादी बाबतींत परकीय कंपन्यांनी भारतात मोठी मुसंडी मारली आहे. अशा वेळी केवळ परकीय उत्पादनांना भुलून, परकीय संस्कृतीला भुलून ग्राहकांनी त्यांच्या विक्रीतंत्रास बळी पडता कामा नये. महत्त्वाचे म्हणजे आपण केवळ एक 'उपभोक्ता'. म्हणून जास्तीत जास्त समाधान मिळवण्याचा प्रयत्न करायचा की एक नागरिक म्हणून स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्यायचे याचा निर्णय घेण्याची जबाबदारी नागरिकांवर आहे.
विक्रीव्यवस्थेचा सर्व खर्च किमतीद्वारे ग्राहकांकडून वसूल करण्यात येतो. वस्तू खरेदी केल्यावर किंवा सेवेचा उपभोग घेताना ग्राहकांना वस्तू व सेवांबाबत विविध अडचणी जाणवतात. या अडचणींची, समस्यांची दाद कशी, कोणाकडे मागावी, आपल्या हिताच्या रक्षणासाठी सरकारने काही कायदे केले आहेत की नाहीत, आपले हक्क व कर्तव्ये कोणती याची माहिती सर्व ग्राहकांना करून देणे फार आवश्यक आहे. ही माहिती अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने, विविध शास्त्रे, कायदा यांचा आधार घेऊन या अभ्यासक्रमाच्या वा शिक्षणक्रमाच्या माध्यमातून जर ग्रामीण तसेच शहरी भागातील ग्राहकांना दिली तर त्याचा फार मोठा चांगला परिणाम ग्राहकांच्या जाणीव जागृतीत होईल.
अभ्यासक्रम
पुस्तक पहिले : ग्राहक : संकल्पना व चळवळ
घटक १ : ग्राहक : संकल्पना व अर्थ
घटक २ : ग्राहकांची कर्तव्ये व अधिकार
घटक ३ : ग्राहक चळवळ स्वरूप व कार्यपद्धती
घटक ४ : स्वयंसेवी ग्राहक चळवळीची कार्यपद्धती व कार्य
पुस्तक दुसरे : ग्राहकांच्या समस्या व निराकरण
घटक १ : ग्राहकांच्या समस्या संकल्पना व कारणे
घटक २ : ग्राहकांच्या समस्यांचे स्वरूप
घटक ३ : ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण
घटक ४ : स्वयंसेवी ग्राहक संघटना व तक्रार निराकरण
घटक ५ : कायदेशीर कारवाईद्वारे तक्रार निराकरण
घटक ६ : ग्रामीण भागातील ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण
घटक ७ : शहरी भागातील ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण
घटक ८ : वस्तूंबद्दलच्या समस्या
घटक ९ : सेवांबद्दलच्या समस्या
पुस्तक तिसरे : ग्राहकांचे अर्थशास्त्र व खरेदीशास्त्र
घटक १ : अर्थशास्त्र : व्याख्या व स्वरूप
घटक २ : बाजारपेठ व ग्राहक
घटक ३ : कौटुंबिक अंदाजपत्रक
घटक ४ : सार्वजनिक आयव्यय व ग्राहक
घटक ५ : ग्राहकांचे खरेदी धोरण
घटक ६ : खरेदी करताना विचारात घ्यावयाचे घटक
घटक ७ : किंमत धोरण
घटक ८ : विपणन
घटक ९ : जाहिरात, प्रसिद्धी व ग्राहक

- --
- --
Vishwanath Kad 28-Aug-2021 03:06 pm
Gautam Lanke 08-Aug-2021 09:47 am
amol 06-Aug-2021 11:25 am
Alankar sonawane 08-May-2021 03:43 pm
Virbhadra Gulve 07-May-2021 10:47 am