ECO 275 | भारताचा आर्थिक विकास | YCMOU BATY ECO275 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.A. |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 184 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
'भारताचा आर्थिक विकास' (ECO 275) हा अभ्यासक्रम एकूण तीन पुस्तकांत विभागण्यात आलेला आहे. 'भारतीय अर्थव्यवस्था आणि भारताची लोकसंख्या' या पहिल्या पुस्तकात आर्थिक विकास साध्य करण्याच्या हेतूने भारतात कोणत्या पद्धतीची अर्थव्यवस्था स्वीकारण्यात आली, नियोजनबद्ध पद्धतीने पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून भारतात आर्थिक विकास साध्य करण्याचे कसे प्रयत्न केले याचे विवेचन करण्यात आले आहे.
आर्थिक विकासात आर्थिक आणि आर्थिकेतर घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. मानवी साधनसंपत्तीसही देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे स्थान असते. मानवी साधनसंपत्ती लोकसंख्येशी निगडित असते; परंतु उपलब्ध लोकसंख्येतून शिक्षित, प्रशिक्षित मानवी साधनसंपत्ती निर्माण करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी शिक्षण, तांत्रिक व व्यवसायाभिमुख शिक्षण देणे महत्त्वाचे ठरते. याबरोबरच जनतेला आरोग्यविषयक सुविधा अल्प दरात, प्रसंगी मोफत व वेळेवर प्राप्त होणे आवश्यक असते. त्यातूनच शारीरिक व मानसिक कौशल्ये विकसित होतात.
मानवी साधनसंपत्ती जरी लोकसंख्येशी निगडित असली तरी जेवढी लोकसंख्या जास्त तेवढी मानवी साधनसंपत्ती जास्त असे नव्हे. वाढती लोकसंख्या, अतिरिक्त लोकसंख्या देशापुढे, अर्थव्यवस्थेपुढे अनेक समस्या निर्माण करते. दारिद्रय, बेकारी, मूलभूत सुविधांची वानवा, इत्यादी समस्या निर्माण होतात. भारतात आज अतिरिक्त लोकसंख्येमुळे अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यासाठी सरकारने लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचे विविध उपाय अमलात आणले आहेत. पण लोकशिक्षण आणि ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार हा खरा या समस्येवरील दीर्घकालीन उपाय होय.
अभ्यासक्रम
पुस्तक १ : भारतीय अर्थव्यवस्था आणि भारताची लोकसंख्या
घटक १ : भारत एक मिश्र अर्थव्यवस्था
घटक २ : आर्थिक विकासाचे निर्धारक घटक
घटक ३ : आर्थिक विकास आणि सरकारी धोरण : परस्परसंबंध
घटक ४ : भारतीय पंचवार्षिक योजना
घटक ५ : प्रचलित आर्थिक समस्या
घटक ६ : भारतातील लोकसंख्येची सद्यः स्थिती
घटक ७ : भारतातील वाढत्या लोकसंख्येची समस्या
घटक ८ : भारताचे लोकसंख्याविषयक धोरण
घटक ९ : मानवी साधनसंपत्तीचा विकास
पुस्तक २ : भारतातील शेती व उद्योग
घटक ०१ : आर्थिक विकासात शेतीचे स्थान
घटक ०२ : शेतीतील अल्प उत्पादकता
घटक ०३ : शेतीविषयक धोरण : भाग - १
घटक ०४ : शेतीविषयक धोरण : भाग - २
घटक ०५ : शेतमजूर व ग्रामीण बेकारी
घटक ०६ : शेती वित्तपुरवठ्याचे स्रोतः भाग - १
घटक ०७ : शेती वित्तपुरवठ्याचे स्रोतः भाग - २
घटक ०८ : शेतमालाचे विपणन
घटक ०९ : शेतमालाच्या किमती
घटक १० : भारताचे औद्योगिक धोरण
घटक ११ : भारतातील सार्वजनिक क्षेत्र
घटक १२ : भारतातील परकीय भांडवल
घटक १३ : भारतातील लघुउद्योग विकास व समस्या
पुस्तक ३ : भारतीय कामगार, आर्थिक धोरणे आणि नियोजनाचे मूल्यमापन
घटक ०१ : भारतीय श्रमबाजार
घटक ०२ : भारतातील संघटित कामगार भाग - १
घटक ०३ : भारतातील संघटित कामगार भाग - २
घटक ०४ : भारतातील असंघटित कामगार
घटक ०५ : भारतातील महिला आणि बाल कामगार
घटक ०६ : मुद्राविषयक धोरण
घटक ०७ : वित्तीय धोरण
घटक ०८ : व्यापारविषयक धोरण
घटक ०९ : राष्ट्रीय उत्पन्नातील बदल
घटक १० : संरचनात्मक बदल / विकास

- --
- --
Swapnil lonare 11-Aug-2021 05:18 pm
laxman 07-Jul-2021 07:52 pm