SOC 312 | वयोवर्धन प्रक्रिया | YCMOU BATY SOC312 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.A. |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 102 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
वयोवर्धन प्रक्रिया (SOC312) - "वृद्धात्व ही सारखी वाढत जाणारी, माणसाचा जोम घटविणारी आणि शेवटी मरणाच्या दारी जाऊन थांबणारी एक शरीरांतर्गत प्रतिकूल बदलांची स्थिती आहे."
"वृद्धत्वम्हणजे नवीन परिस्थितीशी जळवून घेण्याच्या शरराच्या सामर्थ्याचा हास आणि त्यामळे अंतर्गत स्थिती योग्य प्रकारे न सांभाळता येणे होय."
"म्हातारपण म्हणजे तणावाच्या स्थितीला तोंड देण्याच्या शरीरक्षमतेचा हास होय."
वयोवर्धन प्रक्रिया (SOC312) ही मानवी जीवनातील एक अपरिहार्य जैविक प्रक्रिया आहे. ती डोळसपणे समजावून घेतली तर जीवन समायोजन प्रक्रिया सुलभ व्हायला मदत होऊ शकेल. बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत वयोवृद्धांना जीवन समायोजनात अनेक अडसरांना तोंड द्यावे लागत आहे.
वृद्धापकाळात ह्यापूर्वी नियमितपणे मिळणाऱ्या उत्पादनातील संभाव्य घट हा चिंतेचा विषय असतो. तसेच वयोवर्धनानुसार व्यक्तीकडे पाहण्याचा कुटुंबाचा व समाजाचा दृष्टिकोन बदलत जातो. त्यामुळे आर्थिक तसेच मानसिक पातळीवर काही प्रश्न निर्माण होतात. शारीरिक बदलांनी निर्माण होणाऱ्या प्रश्नांइतकेच हेही प्रश्न महत्त्वाचे असतात. त्यांच्याविषयी ज्ञानात्मक जाणीव प्रगल्भ नसल्याने कुटुंबसंस्थेत प्रश्न निर्माण होतात.
अलीकडे 'नटसम्राट', 'संध्याछाया', इत्यादी नाटकांतून ह्या प्रश्नांची तीव्रता मांडण्यात आली आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. शासनाने वयोवर्धन प्रक्रिया लक्षात घेऊन आर्थिक नियोजनात विशेष तरतुदी केल्या आहेत. गावोगाव ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन होऊन वयोवृद्धांना सामाजिक चळवळीच्या माध्यमांतून संघटित केले जात आहे.
अभ्यासक्रम
पुस्तक पहिले : वयोवर्धन प्रक्रिया स्वरूप व व्याप्ती
घटक १ : लोकसंख्या शास्त्र व वार्धक्य
घटक २ : वयोवर्धन प्रक्रिया: वार्धक्यासंबंधी जागतिक विचार
घटक ३ : जैविक बदल व वार्धक्य
घटक ४ : वृद्धांच्या समस्या
पुस्तक दुसरे : वृद्धांचे आरोग्य शारीरिक व मानसिक
घटक १ : वार्धक्य : शारीरिक व मानसिक बदल आणि त्यांचे परिणाम
घटक २ : वार्धक्यातील विकार
घटक ३ : वृद्धांचे आहार व आरोग्य
घटक ४ : वृद्धांच्या आरोग्यविषयक गरजा व आरोग्य संरक्षण नियोजन
पुस्तक तिसरे : वृद्धापकाल समायोजन आणि ज्येष्ठोपयोगी संस्थांची भूमिका
घटक १ : वृद्धापकाळातील सेवा-सुविधा
घटक २ : स्त्रियांचे वृद्धापकाल समायोजन
घटक ३ : वृद्धांचे हक्क व कायदे
घटक ४ : ज्येष्ठोपयोगी संस्था प्रकार, रचना व कार्य
घटक ५ : वृद्धाश्रम सोयी, सेवक वर्ग व व्यवस्थापन

- --
- --
Virbhadra Gulve 11-Oct-2021 01:19 pm