MGM 309 | विपणन व्यवस्थापन - २ | YCMOU MGM Bcom TY eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.Com |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 126 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
'विपणन व्यवस्थापन - २' यात एकूण तीन पुस्तके आहोत. यातील पहिल्या पुस्तकात तीन घटक असून यामध्ये जाहिरातीचा अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, जाहिरात मोहिमेचा अर्थ व नियोजन, जाहिरात अंदाजपत्रक तसेच जाहिरातीचे संघटन या बाबी आहोत.
दुसऱ्या पुस्तकातून विक्रय पूर्वानुमान, विक्रयकला आणि विक्रयवृद्धी, विक्रेता संच व्यवस्थापन यांचा अभ्यास आहे.
तिसऱ्या पुस्तकातून ग्राहक वर्तन, संस्थात्मक खरेदी वर्तन, ग्राहक समाधान व्यवस्थापन आणि विपणन अंकेक्षण या बाबींचा अभ्यास आहे.
अभ्यासक्रम
पुस्तक पहिले : जाहिरात
घटक १ : जाहिरात
घटक २ : जाहिरात मोहीम
घटक ३ : जाहिरातीचे संघटन
पुस्तक दुसरे : विक्रय कला
घटक ४ : विक्रय पूर्वानुमान
घटक ५ : विक्रयकला आणि विक्रयवृद्धी
घटक ६ : विक्रेता संच व्यवस्थापन
पुस्तक तिसरे : ग्राहक समाधान
घटक ७ (अ) : ग्राहकवर्तन
घटक ७ (आ) : संस्थात्मक खरेदीवर्तन
घटक ८ : ग्राहक समाधान व्यवस्थापन
घटक ९ : विपणन अंकेक्षण
पुस्तक पहिले : जाहिरात या पुस्तकांमध्ये 3 घटक आहेत.
घटक १ :
जाहिरात : या घटकात जाहिरातीचा अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट केलेली आहे. जाहिरात व व्यक्तिगत विक्री, जाहिरात व विक्रय वृद्धी योजना, जाहिरात व प्रसिद्धी, जाहिरात व जनसंपर्क यांतील फरक सांगितला आहे. जाहिरातीतून दिला जाणारा संदेश, त्याची रचना व संदेशातील मजकुराचे स्वरूप स्पष्ट केले आहे. तसेच जाहिरातीचे विविध प्रकार व जाहिरातीचे सूत्र (मध्यवर्ती कल्पना), बाह्य रचना, मजकूर-संहिता या गोष्टी आपल्या लक्षात येतील. तसेच चांगल्या जाहिरातीचे आवश्यक घटक आपल्याला माहीत होतील आणि जाहिरातीचे तोटेही आपण सांगू शकाल.
घटक २ :
जाहिरात मोहिम: या घटकात आपण जाहिरात मोहिमेचा अर्थ व जाहिरात मोहिमेचे नियोजन स्पष्ट करू शकाल. यात आपणांस जाहिरातीचे अंदाजपत्रक, त्याचे प्रकार आणि फायदे यांची माहिती सांगता येईल. तसेच जाहिरात माध्यम त्यांचे प्रकार आणि त्यांची निवड कशी करावी हे लक्षात येईल. जाहिरात प्रयत्नांचे मूल्यमापन का व कसे करावे हे आपणांस सांगता येईल.
घटक ३ :
जाहिरातीचे संघटन: या घटकात आपण जाहिरात खाते आणि त्याचे संघटन याची माहिती सांगू शकाल. जाहिरात खात्याची विविध कार्ये सांगू शकाल. जाहिरात व्यवस्थापक व त्याची कार्ये आपणांस सांगता येतील. जाहिरात वितरण संस्था, ग्राहक आणि जाहिरात संस्थेचे संबंध, तसेच जाहिरात संस्था आणि माध्यमे यांतील संबंध हेही आपणांस विशद करता येतील. जाहिरात संस्थेची निवड जाहिरातदाराकडून कंशी केली जाते, जाहिरात संस्थेचे फायदे आणि भवितव्य याचीही माहिती आपणांस सांगा येईल.
पुस्तक दुसरे : विक्रय कला या दुसऱ्या पुस्तकांमध्ये 3 घटक आहेत. विक्रय पूर्वानुमान, विक्रयकला आणि विक्रयवृद्धी, विक्रेता संच व्यवस्थापन.
घटक ४ : 'विक्रय पूर्वानुमान' या घटकातून विक्रय पूर्वानुमानाचा अर्थ, महत्त्व, उद्दिष्ट, पूर्वानुमानाला प्रभावित करणारे घटक, टप्पे आणि प्रकार स्पष्ट होतील. विक्रय पूर्वानुमानाची कार्यपद्धती, विक्रय पूर्वानुमान पद्धती आणि तंत्रे यांचीही माहिती मिळेल. विक्रय पूर्वानुमानाच्या संदर्भात कितीही काळजी घेतली तरी पूर्वानुमानावरही मर्यादा येतात, त्या स्पष्ट होतील.
घटक ५ : 'विक्रयकला आणि विक्रयवृद्धी' या घटकातून विक्रयकलेचा अर्थ, व्याप्ती, फायदे लक्षात येईल. विक्रयवृद्धीचा अर्थ, महत्त्व, पद्धती, रुपे, प्रकार आणि साधनेही स्पष्ट होतील. विक्रयवृद्धी करण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी उद्दिष्टे निश्चित करून कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी कशी करावी ह्याची माहिती मिळेल.
घटक ६ : 'विक्रेता संच व्यवस्थापन' या घटकातून विक्रेत्याची भरती, निवड ह्या संकल्पना स्पष्ट होतील. विक्रेत्यांची निवड झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक असते. विक्रेत्याचे प्रशिक्षण, प्रशिक्षणामुळे होणारे फायदे स्पष्ट होतील. विक्रेत्यांना मानधन, मोबदला दिला जातो त्याच्या विविध पद्धती, विक्रेत्यांचा उत्साह टिकून राहण्यासाठी प्रेरणा द्यावी लागते. त्याचे महत्त्वही स्पष्ट होईल. तर विक्रेत्याच्या कार्यावर नियंत्रण ठेवून मूल्यमापन कसे करावे हेही स्पष्ट होईल.
पुस्तक तिसरे : ग्राहक समाधान या अभ्यासक्रमातील तिसरे पुस्तक आहे. या पुस्तकात तीन घटक आहेत, ग्राहकवर्तन व संस्थात्मक खरेदीवर्तन, ग्राहक समाधान व्यवस्थापन, विपणन अंकेक्षण.
हे तिन्ही घटक वाणिज्य विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचे असून या पुस्तकाद्वारे विद्यार्थ्यांना अनेक नव्या संकल्पनांची माहिती होईल. 'ग्राहकवर्तन' हा विपणनशास्त्रातील अभ्यासातील महत्त्वाचा भाग होय. ग्राहकवर्तन व ग्राहकाची खरेदीप्रक्रिया याचा विपणनशास्त्राच्या अभ्यासकाला बारकाईने अभ्यास करावा लागतो. ग्राहकाची खरेदीप्रक्रिया ही अनेक बाबींनी प्रभावीत होत असते व त्या सर्व बाबींना एकूण विपणनप्रक्रियेत महत्त्व असते.
आधुनिक बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी ग्राहक समाधान व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असते. ग्राहकांचे आक्षेप तक्रारींचे निरसन कसे करावे याबद्दल गंभीरपणे विचार करावा लागतो.
'विपणन अंकेक्षण' ही आधुनिक संकल्पना असूत्त या पुस्तकातील शेवटच्या घटकातून विद्यार्थ्यांना या संकल्पनेचे बहुविध पैलू स्पष्ट होतील.
Yashwantrao Chavan Maharashtra Open University | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) नाशिक | ज्ञानगंगा घरोघरी |

- --
- --
Rahul Shivaji Shelar 07-Jul-2022 05:49 pm
Bhavesh 06-Jul-2022 02:04 pm
vipul gurav 19-Jul-2021 04:22 pm