MGM 224 | व्यवस्थापकीय अर्थशास्त्र (Managerial Economics) | YCMOU SY Bcom MGM eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.Com |
Year/Semester: | 2nd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 175 |
E-Book Price: |
₹ 29
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
'व्यवस्थापकीय अर्थशास्त्र' हा 'व्यवसाय व्यवस्थापन पदविका' शिक्षणक्रमातील अभ्यासक्रम आहे.
भारतात आर्थिक बदलाच्या दिशेने समाजातील राजकीय, आर्थिक व शैक्षणिक जडणघडण यात बदल घडून येत आहेत. उद्योगक्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचे फार खोलवर परिणाम समाजावर होत आहेत. सरकार म्हणजे आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविणारी, लोकांचे जास्तीतजास्त कल्याण करणारी मध्यवर्ती संरचना व आपल्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सरकारच सर्व काही प्रयत्न करेल ही विचारसरणी आता कमी होत चालली आहे.
कार्यक्षमता, उत्पादकता व गुणवत्ता हे तीन परवलीचे शब्द तत्त्वदृष्ट्या रुजू लागले आहेत. जर आपणास स्वतःचे, आजूबाजूच्या परिसराचे व समाजाचे प्रश्न सोडावयाचे असतील तर केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठी स्वतः प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योजकांनादेखील आता केवळ स्वतःच्या मक्तेदारीवर अवलंबून न राहता, देशी उद्योजकांशी होणाऱ्या स्पर्धेवर अवलंबून न राहता परकीय उद्योगांच्या स्पर्धेला तोंड देण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. या सर्व बदलत्या वातावरणात उद्योजकांना, सामान्य व्यक्तींना आपल्या व्यवसायात तसेच नोकरीत आधुनिक व्यवस्थापनातील तत्त्वे अंगी बाळगावी लागतील व आपल्या कामात गुणवत्ता निर्माण करावी लागेल.
'व्यवस्थापकीय अर्थशास्त्र' ही अर्थशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे. व्यवस्थापनात उद्योजकाला अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यात आर्थिक निर्णयांचे प्रमाण व महत्त्व बरेच मोठे आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यासाठी त्या विशिष्ट परिस्थितीची पुरेशी सैद्धांतिक माहिती, तत्त्वे यांचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. या उद्देशाने या अभ्यासक्रमातील पहिले पुस्तक 'व्यवस्थापकीय अर्थशास्त्र स्वरूप व संकल्पना' या पुस्तकाची रचना केलेली आहे.
अर्थशास्त्रातील आर्थिक विश्लेषणाच्या पद्धती, मूलभूत संकल्पना, व्यवस्थापनविषयक निर्णयांचे आर्थिक स्वरूप, इत्यादींविषयी सखोल विश्लेषण करण्यात आलेले आहे. वस्तूच्या मागणीस व्यवसायसंस्थेच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्व आहे. व्यवसायसंस्थेच्या निर्णयाचा केंद्रबिंदू वस्तूकरिता असणारी मागणी हा आहे.
व्यवसायसंस्थेचा अभ्यास करताना व्यवसायसंस्थेचे नेमके उद्दिष्ट काय, कोणत्या कारणांसाठी ती कार्यरत आहे, याचा विचार करणे आवश्यक ठरते. व्यवसायसंस्थेविषयी विविध सिद्धांत मांडले आहेत. त्यात व्यवसायसंस्थेचा आर्थिक सिद्धांत, वर्तणुकीय सिद्धांत, व्यवस्थापकीय सिद्धांत यांचा समावेश होतो. या तिन्ही क्षेत्रांत विविध तज्ञांनी मांडलेले सिद्धांत, नफ्याची संकल्पना, आर्थिक सिद्धांत, नफ्याचे नियोजन व नियंत्रण यांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो.
व्यवसायसंस्थेची प्रगती होण्यासाठी, तिचा विस्तार वाढविण्यासाठी, नवनवीन क्षेत्रांत उत्पादनक्रिया सुरू करण्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना नीट विचारपूर्वक करणे व त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांची वर्तमान काळातील परिस्थितीशी तुलना करणे आवश्यक असते. व्यवसायात गुंतवणूकविषयक निर्णयांना फार महत्त्वाचे स्थान असते.
या अभ्यासक्रमातून आपल्याला व्यवस्थापकीय अर्थशास्त्राचे स्वरूप, व्यवसाय संस्थेअंर्तगत येणारे विविधं निर्णय, व्यवसायसंस्थेचे सिद्धांत, गुंतवणूक विश्लेषण यांविषयीचे ज्ञान प्राप्त होईल.
पुस्तक १ : व्यवस्थापकीय अर्थशास्त्र स्वरूप व संकल्पना (Managerial Economics: Nature and Concepts)
पुस्तक २ : बाजार आणि किंमत निर्धारण (Markets and Price Determination)
पुस्तक ३ : व्यवसायसंस्थांचे सिद्धांत व गुंतवणूक विश्लेषण (Principles of Business Firms and Investment Analysis)
अभ्यासक्रम
पुस्तक १ : व्यवस्थापकीय अर्थशास्त्र : स्वरूप व संकल्पना
घटक १ (अ) : व्यवस्थापकीय अर्थशास्त्र : स्वरूप, उद्दिष्टे व व्याप्ती
घटक १ (आ): आर्थिक विश्लेषण
घटक १ (इ): आर्थिक विश्लेषणाच्या पद्धती
घटक १ (ई): मूलभूत संकल्पना
घटक २ (अ): व्यवस्थापनविषयक निर्णयांचे स्वरूप
घटक २ (आ): व्यवस्थापकीय अर्थशास्त्राची अभ्यासपद्धती
घटक २ (इ): काही मूलभूत संकल्पना : संयंत्र, व्यवसायसंस्था व उद्योग
घटक २ (ई): व्यवसायसंस्थेचा आकार
घटक २ (उ): व्यावसायिक निर्णय
घटक ३ : मागणीची संकल्पना
घटक ४ : मागणीचे विश्लेषण
घटक ५ : मागणीची लबचीकता आणि अंदाज
घटक ६ : मागणीचे पूर्वानुमान
पुस्तक २: बाजार आणि किंमत निर्धारण
घटक ७ : उत्पादन परिव्यय : संकल्पना, प्रकार आणि वक्र
घटक ८ : उत्पादन फल
घटक ९ 'ना नफा, ना तोटा' उत्पादन बिंदू
घटक १० : पुरवठा
घटक ११ : बाजारातील परिस्थिती आणि किंमत उत्पादन निर्णय
घटक १२ : बाजार संरचनेचें विश्लेषण (१)
घटक १३ : बाजार संरचनेचे विश्लेषण (२)
घटक १४ : किंमत निर्धारणाची तंत्रे आणि व्यूह
पुस्तक ३ : व्यवसायसंस्थांचे सिद्धांत व गुंतवणूक विश्लेषण
घटक १५ : व्यवसायसंस्था : मूलभूत दृष्टिकोन
घटक १६ : व्यवसाय संस्थेचा वर्तणूकीय सिद्धांत
घटक १७ : व्यवसायसंस्थेचे व्यवस्थापकीय सिद्धांत
घटक १८ : नफा : संकल्पना व विश्लेषण
घटक १९ : भांडवलाचे अर्थसंकल्पन
घटक २० : जोखीम, निश्चितता व अनिश्चितता
घटक २१ : सरकारी गुंतवणुकीचे निर्णय
Yashwantrao Chavan Maharashtra Open University | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) नाशिक | ज्ञानगंगा घरोघरी
- --
- --
Pravin Rathod 19-Apr-2021 06:10 pm
sushant 29-Mar-2021 09:44 am