MGM 308 | विपणन व्यवस्थापन - १ | YCMOU TY Bcom MGM eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.Com |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 14 Months |
Book Pages: | 108 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
'विपणन व्यवस्थापन - १' या अभ्यासक्रमात एकूण तीन पुस्तके (eBook) आहोत. यातील पहिल्या पुस्तकात चार घटक असून यामध्ये आपण बाजारपेठ आणि विपणन या संकल्पनेची व्याख्या, अर्थ व फरक अभ्यासणार आहोत. विपणन पर्यावरण, विपणन व्यवस्थापन आणि नियोजन, बाजारपेठ विभक्तीकरण आणि लक्ष्य या बाबी पहिल्या eBook मध्ये आहेत.
दुसऱ्या पुस्तकात 'विपणन मिश्र आणि सेवांचे विपणन' हा भाग आहे.
तिसऱ्या पुस्तकात विपणन माहिती व्यवस्था, विपणन संशोधन आणि विपणन नियंत्रण या बाबींचा अभ्यास आहे.
अभ्यासक्रम
पुस्तक पहिले : विपणन
घटक १ : बाजारपेठ आणि विपणन
घटक २ : विपणन पर्यावरण
घटक ३ : विपणन व्यवस्थापन आणि नियोजन
घटक ४ : बाजारपेठ विभक्तीकरण आणि लक्ष्य
पुस्तक दुसरे : विपणन मिश्र
घटक ५ : विपणन मिश्र
घटक ६ : सेवांचे विपणन
पुस्तक तिसरे : विपणन माहिती
घटक ७ : विपणन माहिती व्यवस्था
घटक ८ : विपणन संशोधन
घटक ९ : विपणन नियंत्रण
विपणन व्यवस्थापन १ ह्या Bcom TY eBook मध्ये एकूण तीन पुस्तकांचा अभ्यास आहे. त्यांपैकी विपणन या पहिल्या पुस्तकात ४ घटक आहेत.
घटक १ : बाजारपेठ आणि विपणन या घटकात बाजारपेठ आणि विपणनाची व्याख्या, अर्थ, फरक स्पष्ट केलेला आहे. त्याचबरोबर विपणनाचे महत्त्व, संकल्पना, संकल्पनेचा उगम व विकास, आधुनिक विपणनाच्या आवश्यक बाबी, ग्राहकांच्या गरजांचा विचार करत असताना सामाजिक हितही लक्षात घ्यावे लागते. त्यासाठी सामाजिक विपणनाची माहिती दिलेली आहे. खुल्या आर्थिक धोरणामुळे आणि जागतिक व्यापार संघटनेमुळे विपणनाचे जागतिकीकरण झालेले आहे त्याची माहिती या घटकात दिलेली आहे.
घटक २: विपणन पर्यावरण या घटकात विपणन पर्यावरणाचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट होईल; विपणन धोरण आणि पर्यावरण यावर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि कायदेशीर घटकांच्या होणाऱ्या परिणामांची माहिती दिलेली आहे.
घटक ३: विपणन व्यवस्थापन आणि नियोजन या घटकात विपणन व्यवस्थापनाचा अर्थ, कार्ये, विपणन नियोजन अर्थ, महत्त्व, उद्दिष्टेट, प्रक्रिया, प्रकार, नियोजनाच्या आवश्यक बाबी आणि नियोजनाच्या समस्या यांची माहिती दिलेली आहे.
घटक ४: बाजारपेठ विभक्तीकरण आणि लक्ष्य या घटकात बाजारपेठ विभक्तीकरणाचा अर्थ, खर्च, आधार, फायदे आणि परिणामकारक विभक्तीकरणाच्या आवश्यक बाबी यांची माहिती दिलेली आहे. विपणन लक्ष्य, विपणन लक्ष्याची व्यूहरचना आणि व्यूहरचनेची निवड याचे स्पष्टीकरण मिळेल.
'विपणन मिश्र' या पुस्तकात eBook मध्ये दोन घटक आहेत.
घटक ५ : 'विपणन मिश्र' या घटकांतून आपणास विपणन मिश्र, उत्पादित वस्तू या संकल्पना समजतील. उत्पादित वस्तूच्या वर्गीकरणाची कल्पना, उत्पादनाची नावीन्यता सांगता येईल. त्याचबरोबर नवीन उत्पादनाच्या संदर्भात धोरण, किंमत आणि उत्पादन वितरण याचे धोरण कसे ठरवावे याची माहितीही समजेल.
उत्पादित वस्तू ग्राहकांपर्यंत वितरित करण्यासाठी वितरण प्रक्रिया ठरवावी लागते. या वितरण प्रक्रियेवर कोणते घटक परिणाम करतात हेही स्पष्ट होईल. विक्रयवृद्धीचा अर्थ, वैशिष्ट्ये, उद्देश, महत्त्व, विक्रयवृद्धी विभागाचे कार्य, मर्यादा, विक्रयवृद्धीचे प्रकार, पद्धती आणि विक्रय वृद्धी व्यवस्थापनाचे कार्य, कर्तव्य व दायित्व हे मुद्देही स्पष्ट होतील.
घटक ६ : 'सेवांचे विपणन' या घटकात सेवा म्हणजे काय? सेवा क्षेत्र विकासाची कारणे, सेवा विपणन : अर्थ व आवश्यकता, वस्तू सेवांमधील फरक, सेवांची वैशिष्टचे, सेवा विपणनांचे महत्त्व, सेवांचे वर्गीकरण या मुद्यांची माहिती आहे.
सातव्या घटकातून 'विपणन माहिती व्यवस्थेचा' अर्थ, या व्यवस्थेतील घटक व या व्यवस्थेची कार्ये स्पष्ट होतील. आठव्या घटकातून विपणन संशोधनाची संकल्पना, उद्दिष्टे, गरज, घटक, व्याप्ती, प्रकार, प्रक्रिया वः फायदे-मर्यादा स्पष्ट होतील. नवव्या घटकातून विपणन नियंत्रणाचा अर्थ, उद्देश, व्याप्ती व तंत्र तसेच परिणामकारक विपणन नियंत्रण प्रणाली, आवश्यक तत्त्वे हे मुद्दे स्पष्ट होतील.
Yashwantrao Chavan Maharashtra Open University | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) नाशिक | ज्ञानगंगा घरोघरी |

- --
- --
Tejasvini Nimde 12-Aug-2021 02:27 pm