COM 306 | बैंकिंग व फायनान्स-१ | YCMOU TY Bcom Commerce eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.Com |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 93 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
पुस्तक पहिले : बँक व्यवसाय
पुस्तक दुसरे : बँक व्यवसाय व कायदे
पुस्तक तिसरे : बँकांचे प्रकार
अभ्यासक्रम
पुस्तक पहिले : बँक व्यवसाय
घटक १ : व्यापारी बँका अर्थ आणि कार्ये
घटक २ : बँक व्यवसायाची मूलतत्त्वे, पतपैशाची निर्मिती आणि बँकांचा ताळेबंद
घटक ३ : बँकेत खाते उघडणे आणि खात्यावरील व्यवहार
पुस्तक दुसरे : बँक व्यवसाय व कायदे
घटक १ : तारण म्हणून स्वीकारण्यात येणारी मालमत्ता आणि तारणाचे प्रकार
घटक २ : भारतातील व्यापारी बँकिंगच्या क्षेत्रातील सुधारणा
घटक ३ : बँकिंग व्यवसायाशी संबंधित कायदे
पुस्तक तिसरे : बँकांचे प्रकार
घटक १ : प्रादेशिक ग्रामीण बँका
घटक २ : सहकारी बँका आणि खाजगी बँका
घटक ३ : भारतीय रिझर्व बँक
'बैंकिंग व फायनान्स-१' Bcom TY या पुस्तकात एकूण तीन घटक असून त्यांची कार्य पुढीलप्रमाणे आहेत :
* पहिल्या घटकात बँक या शब्दाची उत्पत्ती आणि बैंकिंगच्या व्यवसायाचा उगम, बैंक या संज्ञेचा अर्थ, पेढीवाले आणि एतद्देशीय बैंक व्यावसायिक यांच्या व्यवसायाची माहिती, बँकांची प्राथमिक कार्ये, दुय्यम कार्यांची माहिती व बैंका देत असलेल्या नावीन्यपूर्ण सेवा यांची माहिती मिळेल.
* दुसऱ्या घटकात बैंक व्यवसायाची मूलतत्त्वे, बँका ज्या प्रक्रियेतून पतपैशाची निर्मिती करतात तिचे ज्ञान व बँकांनी दर आर्थिक वर्षानंतर तयार करावयाचा ताळेबंद या भागाचा समावेश आहे.
* तिसऱ्या घटकात बँकेत खाते उघडणे, खाते पुस्तकांची उपयुक्तता, धनादेशाचे प्रकार, पैसे पाठवण्याच्या पद्धती, ग्राहकांशी व्यवहार करताना बँकेने ध्यावयाची काळजी यासंबंधीची माहिती मिळेल.
बँकांच्या प्रमुख कार्यामध्ये कर्जे देणे ही प्राथमिक महत्त्वाची बाब आहे. दिलेल्या कर्जावरील व्याजाची नियमित प्राप्ती, त्या कर्जाची रोख रुपांतरक्षमता, कर्जाची नियमित वेळेत परतफेड यावर बँकांच्या एकूण कार्याचे यश अवलंबून असते.
अर्थात नुकसानीचे किमानीकरण, व्याजाचे कमालीकरण, कर्जदाराची पत, कंर्ज परतफेडीची त्याची क्षमता या सर्व गोष्टी कर्ज देण्यासाठी बँकांनी कर्जदाराकडून कोणते तारण घेतले, त्या तारणाची आर्थिक व वित्तीय गुणवत्ता काय, अशा मालमत्तेचे रोखीत, कमीत कमी वेळेत, कमीत कमी नुकसानीने रुपांतर होण्याची क्षमता, यांसारख्या घटकावर अवलंबून असते. त्यामध्ये प्रामुख्याने धारणाधिकार (Lien), तारण (Pledge), गहाण (Mortgage) आणि नजरगहाण (Hypothecation) यांचा समावेश होतो.
तारणासाठी विविध मालमत्तेचा आधार घेतला जातो. त्यात मुख्यतः जमीन, इमारत, सोने, चांदी, समभाग, कर्जरोखे, शेतीमाल, इत्यादींचा समावेश होतो. अशा तारणावर कर्ज देताना बँकांना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. उपरोक्त सर्व घटकांचा अभ्यास आपण सविस्तरपणे या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात करणार आहोत.
या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात आपण मुख्यतः भारतीय बँकिंग क्षेत्रात अलीकडच्या काळात झालेल्या महत्वाच्या बदलांचा चिकित्सक आढावा घेणार आहोत. या आढाव्याची पार्श्वभूमी म्हणून प्रारंभी भारतातील व्यापारी बँकिंगचे स्वरूप व संरचना थोडक्यात पण नेमकी देण्यात येईल.
त्यानंतर १९९१-९२च्या म्हणजेच नव्या आर्थिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर, बँकिंग क्षेत्रात झालेल्या व करण्यात आलेल्या महत्त्वाच्या बदलांचा चिकित्सक आढावा घेण्यात येईल. त्यात नरसिंहम समितीचे अहवाल, त्यातील महत्त्वाच्या सूचना, रोख निधी प्रमाण (CRR), वैधानिक रोखता प्रमाण (SLR), भांडवल पर्याप्तता (Capital adequacy), उत्पन्न न देणाऱ्या मालमत्तेचा प्रश्न व त्यासाठीच्या तरतुदी (Non performing assets and provisioning) यांचा आढावा घेतला जाईल.
तिसऱ्या प्रकरणात बँकिंगविषयक महत्त्वाच्या कायद्यांचा व त्यातील महत्त्वाच्या कलमांची विश्लेषणात्मक माहिती दिली जाणार आहे. विशेषतः त्यात बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट (B.R. Act), फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (FEM Act), चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा (Negotiable Instruments Act), ठेव विमा व पतहमी महामंडळाचा कायदा (Deposit Insurance and Credit Guarantee Act) यांच्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येईल.
या पुस्तक क्रमांक २ मुळे थोडक्यात तारण व तारणाचे प्रकार, कर्ज देताना बँकांनी घ्यावयाची काळजी, तारणक्षम मालमत्ता, भारतीय बँकिंगचे स्वरूप, संरचना, भारतीय बँकिंगमधील अलीकडचे महत्त्वाचे बदल तसेच बँकिंगविषयक कायदे यांचा नेमका, अर्थपूर्ण परिचय व्हावा हा मुख्य हेतू आहे.
घटक ७ (अ): 'प्रादेशिक ग्रामीण बैंका' या घटकातून प्रादेशिक ग्रामीण बँकांची आवश्यकता, स्थापना, ह्या बँकांची रचना, संघटन आणि कार्ये, प्रादेशिक बँकांची प्रगती कशी होत गेली याची आकडेवारी ही माहिती मिळेल. तसेच प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील दोषांची आणि त्यावरील उपाययोजनांसाठी नेमलेल्या समित्यांचीही माहिती मिळेल.
घटक ७ (आ): 'भारतीय सहकारी बँक व्यवसाय' या घटकातून भारतातील सहकार चळवळीची प्रगती ही भारतीय रिझर्व्ह बँक, स्टेट बँक आणि राज्यांचे सहकार खाते यांच्या नियंत्रणाखाली झाली. प्राथमिक पातळीवरील सहकारी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्य सहकारी शिखर बैंका, प्राथमिक / राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बैंका, नागरी सहकारी बँका, इत्यादी बँकांची स्थापना झाली. त्यांचे संघटन, पैसे उभारण्याचे मार्ग, व्यवस्थापन, कार्ये, प्रगती आणि दोष यांचीही माहिती मिळेल.
घटक ८ (अ): 'भारतीय रिझर्व्ह बँक' या घटकात बैंक व्यवसाय, नाणेबाजार व भांडवल बाजार यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक देशात मध्यवर्ती बँकास्थापन करण्यात आल्या. त्यांचे संघटन, व्यवस्थापन कार्ये ह्यांची माहिती मिळेल.
घटक ८ (आ): भारतीय रिझर्व्ह बँक या घटकातून पत्रनियंत्रणाची उद्दिष्टे व आवश्यकता स्पष्ट होईल. संस्थात्मक पत्रनियंत्रणाचा अर्थ, कार्यपद्धती, बैंक धोरण, बैंकदरावरील मर्यादा, खुल्या बाजारातील रोखतेच्या प्रमाणातील बदल, रोख्यांचे व्यवहार, त्यांचा अर्थ, कार्यपद्धती, मर्यादा स्पष्ट केलेल्या आहेत.
Yashwantrao Chavan Maharashtra Open University | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) नाशिक | ज्ञानगंगा घरोघरी |

- --
- --
Kiran Bhuvad 03-Aug-2021 05:44 pm
Abhay Patil 09-May-2021 11:54 am