COM 211 | कार्यालयीन व्यवस्थापन अधिष्ठान अभ्यासक्रम | YCMOU FYBcom COM211 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.Com |
Year/Semester: | 1th Year - No Semester |
Duration: | 14 Months |
Book Pages: | 131 |
E-Book Price: |
₹ 23
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
कार्यालय म्हणजे संस्थेतील कामाचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासकीय स्वरूपाचे काम करणारा विभाग होय. कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर संस्थेची कार्यक्षमता अवलंबून असल्यामुळे कार्यालय प्रमुखास प्रशासनाधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते.
कार्यालय व्यवस्थापकाचे स्थान विचारात घेता कार्यालय व्यवस्थापक हा मध्यम स्तरावरून कार्य करणारा अधिकारी आहे असे मानले जाते. कार्यालय व्यवस्थापक हा सर्वसाधारणपणे पदवीधर असावा असा संकेत आहे. कार्यालय व्यवस्थापकाच्या अंगी विविध प्रकारचे आत्मिक गुण व बौध्दिक गुण असावे लागतात. कार्यालय प्रमुख म्हणून त्यास अनेकविध अधिकार प्राप्त होतात.
कार्यालय व्यवस्थापकास उच्चस्तरावरील व्यवस्थापनाच्या बाबत, सहायक अधिकारी व कर्मचारी यांच्या बाबत, मध्यमस्तरावरील व्यवस्थापनाच्या बाबत, तसेच कार्यालयीन कामकाजाबाबत काही कर्तव्येव जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कार्यालय व्यवस्थापकाचे एकूण संघटन रचनेतील स्थान विचारात घेता त्याला अनेक कामे पार पाडावी लागतात.
पुस्तक :- 1 कार्यालय : रचना व कार्यपध्दती :-
कार्यालय म्हणजे संस्थेचा असा एक विभाग असतो, की जेथे संस्थेतील कामाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी संस्थेतील व्यवहारांच्या नोंदी केल्या जातात. त्या नोंदींचे जतन केले जाते व त्यांचा वापर केला जातो, तसेच अंतर्गत व बहिर्गत संपर्कविषयक सोयी उपलब्ध करून देऊन संस्थेच्या निरनिराळ्या खात्यांच्या कामांमध्ये एकसूत्रता आणली जाते.
पुस्तक :- 2 कार्यालय संघटन व कर्मचारी व्यवस्थापन :-
विशिष्ट उद्देशांच्या पूर्तीकरता एकत्रितपणे काम करणाऱ्या व्यक्तींच्या समूहात परस्परसंबंध निश्चित करण्यासाठी त्यांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि अधिकार निश्चित करून त्यांच्या कामात सुसूत्रीकरण साधण्याकरिता उभारण्यात येणाऱ्या यंत्रणेला संघटना असे म्हणतात. त्याकरिता जी विविध कार्ये करावी लागतात त्यांना संघटन कार्य असे म्हणतात.
कर्मचाऱ्यांच्या गरजा व संघटनेची आवश्यकता यात समन्वय साधण्याचे कार्य कर्मचारी व्यवस्थापनाचे असते. कार्यालयात परस्पर सलोख्याचे संबंध आपोआप तयार होत नाहीत. व्यवस्थापकीय दृष्टिकोन आणि कृती यांचा तो एक संयुक्त परिणाम असतो. चांगले संदेशवहन, कार्यालय समित्या व सूचनाप्रणाली आणि कर्मचारी कल्याण आदी बाबींमुळे कर्मचारी संबंध सुधारतात. संघटनेच्या आत आणि बाहेर होणारे कार्यात्मक स्थित्यंतरे म्हणजे कर्मचारी उलाढाल होय.
पुस्तक :- 3 दप्तर व्यवस्थापन व जनसंपर्क :-
कचेरीत कागदपत्रांची वर्गवारी करणे जरुरीचे असते. कोणत्या व्यवहारास प्राधान्य द्यावे किंवा कसे याची माहिती असावी. दप्तर व्यवस्थान हे एक कौशल्य आहे. अशा कामात उत्पादकता वाढविण्यासाठी प्रशिक्षणाची जरुरी असते. सेवकवर्गास विश्वासात घ्यावे लागते. कामात विविधता यावी व त्यात लवचीकता असावी.
कोणत्याही संस्थेमध्ये कार्यालय हे फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. योग्य जनसंपर्क ठेवून कार्यालय संस्थेची जनमानसांत चांगली प्रतिमा करते. अंतर्गत संदेशवहन योग्य ठेवून संस्थेची उद्दिष्टे साध्य होण्यास मदत करते. तसेच संस्थेच्या पत्रव्यवहाराची योग्य काळजी घेऊन संस्थेच्या कामकाजात मदत करते.
पुस्तक :- 1 कार्यालय : रचना व कार्यपध्दती (Office: Structure and Procedures)
घटक 1 : कार्यालय
घटक 2 : कार्यालयाचे स्थान व अंतर्गत रचना
घटक 3 : कार्यालयीन कार्यपद्धती
घटक 4 : कार्यालय व्यवस्थापक
पुस्तक :- 2 कार्यालय संघटन व कर्मचारी व्यवस्थापन (Office Organization and Staff Management)
घटक 1 : कार्यालय संघटन
घटक 2 : कार्यसंस्कृती व कार्यालयीन कर्मचारी
घटक 3 : कार्यालयीन प्रशिक्षण
घटक 4 : कर्मचारी व्यवस्थापन
पुस्तक :- 3 दप्तर व्यवस्थापन व जनसंपर्क (Office Management and Public Relations)
घटक 1 : दप्तर व्यवस्थापन
घटक 2 : इतर कार्यालयीन सेवा
घटक 3 : कार्यालयातील यंत्रे व उपकरणे
घटक 4 : माहितीपुस्तिका व अहवाल
घटक 5 : जनसंपर्क

- --
- --
21-Dec-2024 01:17 am
Virbhadra Gulve 26-Jul-2023 10:09 am
Gajanan Balaji Ladke 15-Jan-2023 07:39 am
Amar 13-Jan-2023 12:54 pm
Nilesh Ramu Gavade 25-Jun-2022 06:23 pm
nik 13-May-2022 06:16 pm
Sujit Nagar 08-May-2022 06:35 pm
Shaikh yusuf 08-Aug-2021 04:58 pm
pratiksha 17-Jul-2021 05:27 pm