यू टर्न
Duration: | Unlimited |
---|---|
Book Pages: | 78 |
Price: |
Free
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
खरचं विश्वास किती महत्त्वाचा असतो ना, जेव्हा आपलं जीवन संपत असतं, निराशेच्या गर्देत आपण हरवतोत, तेव्हा गरज असते कोणाच्या तरी विश्वासाची, कोणाच्या तरी मायेची वाटायला लागतं की कोणीतरी आपल्याला असं म्हणणारं हवं की मी आहे ना तू चाल पुढे! गरज होती अश्याच कोणाच्या तरी थापेची, आपलेपणाची, तेव्हाच माझ्या आयुष्यात मला गुरू लाभले आणि माझ्या आयुष्याने यू टर्न घेतला! खरतर हा यू टर्न भेटत नसतो, तो आणावा लागतो, कधी अपयश पचवून तर कधी अपमान सहन करून... माझ्या आयुष्यातील असाच हा यू टर्न मला या पुस्तकात लीहावासा वाटतो, आणि सांगायला आनंद होतो, की हे माझं पहिलं पुस्तक असणार आहे आणि तर ही माझ्याच जीवनावर! खरंतरं मी एवढी मोठी ही नाही की मी माझा आत्मचरित्र लिहावं कारण अजून माझा खूप आयुष्य बाकी आहे आणि त्याचबरोबर अनुभव देखील....परंतू गुरुशिष्य परंपरा मी या हरवत चाललेल्या आणि दिशाभूल होत असलेल्या या पिढीत मी पाहिली आणि स्वतः अनुभवली... हे पुस्तकं लिहिण्यामागचा हेतू आणि उद्देश हाच आहे की माझ्यासारखी एक निराशेत जगणारी मुलगी जर तिच्या आयुष्यात नव्याने उभारू शकते तर या जगात अशक्य अस काही नाही....
हे पुस्तक लिहिण्यामागे माझ्या दयानंद कला महाविद्यालयाचे सर्वांत मोठे श्रेय आहे, मी आज जे काही आहे ते या महाविद्यालयामुळेच! मला पुस्तक लिहीण्या योग्य बनविणाऱ्या माझ्या सर्व गुरूंचा विश्वास आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, म्हणूनच मी हे पुस्तक त्यांना समर्पित करते!
पुस्तकाची सुरुवात करण्याआधीच मला हे वाचकांना सांगावं वाटतं की हे पुस्तक माझ्याच जीवनावर आधारित असल्याने यात काही उदाहरणं मी स्वतः चे देखील दिले आहेत, माझ्या आयुष्यात काय आणि कसे बदल होत गेले हे मी या पुस्तकातून लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.मी सुरुवातीला म्हंटल्या प्रमाणे की मी तेवढी मोठी ही नाही की मी माझा कमी वयामधे एक आत्मचरित्र लिहावं... आणि म्हणतात ना की माणूस हा त्याच्या वाढत चाललेल्या वयामुळे किंवा त्याच्या जाडी किंवा उंचीमुळे मोठा होत नसतो तर त्याचे अनुभवच त्याला मोठे बनवत असतात खरतर माझे वय हे कमी आहे आणि मला आणखीन खूप अनुभव देखील घ्यायचे आहेत पण या छोट्याशा वयामध्ये देखील या आयुष्याने भरपूर असे अनुभव मला दिले. खरच काय ताकद असते गुरूंच्या विश्वासाची हे सांगत असताना मी अनुभवलेले गुरू शिष्याचे नाते आणि त्याच बरोबर होत गेलेले बदल लिहावे लागतील जेणे करून वाचकांना देखील या पुस्तकातून सत्य वास्त्ावस्थिती पहावयास मिळेल.
खरंतरं माझ्या महाविद्यालयाबरोबरच, माझ्या गुरुंबरोबरच यात माझ्या मित्र आणि मैत्रिणींचा देखील फार मोठा वाटा आहे, जीवन जगत असताना अडचणी तर येत असतातच आई वडील यांच्या व्यतिरिक्त आपण आपले दुःख सर्वाधिक आपल्या मित्र मैत्रिणींसमोर मांडत असतो, मग ते कोणतही दुःख असो किंवा कोणतही सुख असो, दुःख मित्र मैत्रिणीत वाटल्याने ते कमी होत आणि सुख वाटल्याने ते दुप्पट होतं. दुःखात आई वडील सांत्वन करतात, गुरू हिम्मत देतात, तर मित्र मैत्रिणी आपल्या दुःखाला हे स्वतःचं दुःखं समजून आपल्या खांद्याला खांदा लावून खंबीर पणे उभे असतात, आपल्या यशामध्ये त्यांना ही तितकाच वाटा असतो जितका आपल्या स्वतःचा असतो.त्यामुळे आई वडील, गुरू याचबरोबर माझ्या मित्र आणि मैत्रिणींचा वाटा यात सर्वाधिक आहे. मोठ्यांचा, गुरूंचा पाठीशी असलेला आशीर्वाद, मित्र आणि मैत्रिणींचे प्रेम, आपुलकी या सगळ्यांना माझा हे पुस्तक मी समर्पित करते!
- --
- --
यू टर्न
सई संजय शिंदे
Paperback
ISBN 978-93-92464-52-2
E-Book
ISBN 978-93-92464-53-9
25-Nov-2023 12:12 pm
26-Sep-2023 03:27 am
Sushant Gaikwad 08-Sep-2023 02:51 am
pravinjadhav 08-Sep-2023 02:14 am
Sayee Shinde 04-Jun-2023 06:55 am
Tushar shinde 31-May-2023 10:20 am