कृषी अर्थशास्त्र (AGRICULTURAL ECONOMICS) NEP 2020 Book
| Duration: | 24 Months |
|---|---|
| Book Pages: | 344 |
| E-Book Price: |
₹ 29
|
|---|---|
| Physical Book Price: |
₹ 310
|
| E-Book Buy Date: |
--
|
|---|---|
| E-Book Expiry Date: |
--
|
| Audio Buy Date: |
--
|
| Audio Expiry Date: |
--
|
भारत हा शेतीप्रधान देश असून, कृषी क्षेत्र हे आपल्या अर्थव्यवस्थेचे जीवनदायी अधिष्ठान आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आणि समाजरचनेची घडी ही शेतीवरच आधारित आहे. आज शेती क्षेत्र केवळ अन्नधान्यनिर्मितीपुरते मर्यादित नसून देशाच्या औद्योगिक विकासाला, रोजगारनिर्मितीला आणि राष्ट्रीय उत्पन्नाला स्थैर्य प्रदान करणारे शक्तिकेंद्र बनले आहे.
बदलत्या आर्थिक परिदृश्यात शेतीचे स्वरूप, उत्पादनपद्धती आणि वित्तीय गरजा सतत बदलत आहेत. या बदलत्या पार्श्वभूमीवर कृषी अर्थशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्याचे शैक्षणिक व व्यावहारिक महत्त्व अधोरेखित करणे आवश्यक झाले आहे. या जाणिवेतूनच प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. या ग्रंथाचा उद्देश विद्यार्थ्यांना कृषी अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, तत्त्वे आणि व्यवहार्य पैलू यांची समज प्राप्त करून देणे हा आहे. या ग्रंथामध्ये कृषी अर्थशास्त्राची ओळख, उत्पादन व उत्पादकता, कृषी वित्त, दर धोरण, तसेच भारतीय शेतीतील विद्यमान समस्या या प्रमुख विभागांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक विषय शास्त्रशुद्ध, संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक पद्धतीने मांडला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाचे सखोल आकलन होईल.
अलीकडील काळात कृषी क्षेत्रात विविध नवे प्रवाह उदयास आले आहेत. शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, करार शेती, कृषी वनीकरण यांसारख्या विषयांचा समावेश करून या ग्रंथात आधुनिक शेतीचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक व आधुनिक शेती यांचा तुलनात्मक अभ्यास करता येईल.
कृषी अर्थशास्त्र या विषयाच्या अध्ययनाद्वारे विद्यार्थ्यांना भारतीय शेतीची आर्थिक रचना, तिची आव्हाने आणि विकासाची दिशा यांचे भान निर्माण व्हावे, हाच आमचा मुख्य हेतू आहे. हा ग्रंथ अभ्यासकांसाठी एक उपयुक्त संदर्भग्रंथ ठरेल, अशी आम्हाला मनापासून खात्री आहे.
अनुक्रमणिका
१. कृषी अर्थशास्त्राचा परिचय
१.१ कृषी अर्थशास्त्राची व्याख्या व व्याप्ती
१.२ कृषी अर्थशास्त्राच्या अभ्यासाची गरज
१.३ कृषीचा उद्योग आणि सेवा क्षेत्राशी संबंध
१.४ आर्थिक विकासात कृषीची भूमिका/महत्व
२. कृषी उत्पादन व उत्पादकता
२.१ कृषी उत्पादन आणि उत्पादकता यांचा अर्थ
२.२ कृषी उत्पादन व उत्पादकतेवर परिणाम करणारे घटक
२.३ भारतातील कृषी उत्पादकता कमी असण्याची कारणे
२.४ भारतामध्ये कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी उपाय
३. भारतातील कृषी वित्त
३.१ कृषी कर्जाची गरज
३.२ कृषी वित्त पुरवठ्याचे स्त्रोत
३.३ संस्थात्मक कर्ज स्रोत
३.४ कृषी कर्जामध्ये व्यापारी बँकांची भूमिका
३.५ नाबार्ड
४. कृषी मूल्य धोरण
४.१ कृषी मालाच्या किंमतीत चढउतार होण्याची कारणे
४.२ कृषी मालाच्या किमतीतील चढ-उतारांचे परिणाम
४.३ कृषी मूल्य स्थिरीकरण अर्थ व महत्त्व
४.४ कृषी मूल्य स्थिरीकरणासाठी साधने
४.५ कृषी खर्च व किंमत आयोग
५. भारतीय कृषी क्षेत्रातील समस्या
५.१ कृषी संकटाची/आरिष्टाची कारणे
५.२ शेतकरी आत्महत्या कारणे व उपाय
५.३ कृषी वाढीवर सार्वजनिक खर्चाचा परिणाम
५.४ भारतीय शेतीतील शेतमजूराच्या कामगारांच्या समस्या
५.५ भारतातील शेतमजुरांच्या टंचाईची कारणे
६. कृषी क्षेत्रातील विविधीकरण
६.१ कृषी विविधीकरण अर्थ व महत्व
६.२ फुलशेती (फ्लोरीकल्चर) अर्थ व महत्त्व
६.३ फलोत्पादन (हॉर्टिकल्चर) अर्थ व महत्त्व
६.४ मत्स्य व्यवसाय - अर्थ व महत्त्व
७. भारताच्या शेती विकासातील नवे प्रवाह
७.१ शाश्वत शेती
७.२ सेंद्रिय शेती
७.३ करार शेती/कंत्राटी शेती
७.४ कृषी वनीकरण
८. जागतिकीकरण आणि कृषी धोरण
८.१ आंतरराष्ट्रीय व्यापारातील कृषी उत्पादनांचे महत्त्व
८.२ जागतिक व्यापार संघटना आणि भारतीय शेती
८.३ राष्ट्रीय कृषी धोरण
८.४ कृषीविषयक करार (AOA) विकसनशील देशांसाठी धडे
- --
- --