राज्यशास्त्र व्याख्याकोश (डॉ. राजशेखर सोलापुरे) | Rajyashastra Vyakhyakosh (Dr. Rajshekhar Solapure)
Duration: | Unlimited |
---|---|
Book Pages: | 368 |
Physical Book Price: |
₹ 400
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
'राज्यशास्त्र व्याख्याकोश' हा केवळ राजकीय शब्दांच्या व्याख्यांचा कोश नाही किंबहुना तसा तो असूही शकत नाही. राज्यशास्त्राशी अनुबंध असणाऱ्या इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, कायदा, लोकप्रशासन, जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या, संरक्षणशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान अशा आंतरविद्याशाखीय शब्दांच्या व्याख्यांनी या कोशाचा परीघ विस्तारलेला आहे.
व्याख्येचीच व्याख्या करताना राज्यशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटल म्हणतो की, "व्याख्या म्हणजे ज्ञानाचा आरंभ आणि अंत होय."
५११ शब्दांच्या प्रमाण, परिपूर्ण, प्रभावी आणि प्रमुख अशा व्याख्यांना मांडण्याचा हा प्रकल्प आहे. ५११ आंतरविद्याशाखीय शब्द असले तरी त्यांचा प्रत्यक्ष संबंध राज्यशास्त्राशीच असल्याने त्यांचा अंतर्भाव कोशात करण्यात आला आहे. हजारो व्याख्यांचा हा कोश संशोधन आणि अध्ययनात प्रत्येकाला उपयुक्तच ठरेल, याबद्दल कसलीही शंका नाही. तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रात कार्य करणारी मंडळी राज्यशास्त्रातील अनेक शब्दांचा अर्थ माहीत नसतानाही त्या शब्दांचा मोघम वापर करतात. त्या सर्वांसाठी हा कोश मार्गदर्शक ठरेल.
"राज्यशास्त्र व्याख्याकोश" हा MPSC विद्यार्थ्यांसाठी एक अमूल्य ठेवा आहे. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन, अर्थशास्त्र आणि भूगोल यांसारख्या विषयांतील गुंतागुंतीच्या संकल्पना सुलभ आणि स्पष्ट भाषेत समजावून सांगण्याचे डॉ. राजशेखर सोलापुरे यांचे उत्कृष्ट संशोधन आणि लेखन कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. प्रभाकर पब्लिकेशन, लातूर यांनी हा दर्जेदार संदर्भग्रंथ उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे पुस्तक नक्की वाचावे!
डॉ. राजशेखर सोलापुरे (शिक्षण: एम.ए. राज्यशास्त्र / इतिहास, बी. एड्., बी.जे., एम.फिल., पीएच.डी.)
पत्ता : संत ज्ञानेश्वर नगर, राजीव गांधी चौकाजवळ, रिंगरोड, लातूर.
मो. 9423345822, 8329954315
E-mail - rajshekhar.solapure@gmail.com
: स्वलिखित प्रकाशित ग्रंथ :
१) प्रभावी सूत्रसंचालनाची कला, २) उत्कृष्ट भाषण कला, ३) भारतीय शासन आणि राजकारण, ४) ग्रामोद्धाराचे प्रणेते राष्ट्रसंत तुकडोजी, ५) सामाजिक कायदा, ६) महाराष्ट्र शासन आणि राजकारण, ७) लिंगायत एक स्वतंत्र धर्म, ८) महाराष्ट्रातील शासनव्यवस्था आणि राजकारण, ९) महान विचारांच्या प्रकाशात, १०) मानवी हक्क आणि समाज, ११) आधुनिकतेचे अग्रदूत महात्मा बसवेश्वर, १२) लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया, १३) आधुनिक राजकीय विश्लेषण, १४) समाजसुधारक सर्वसमावेशक, १५) राजकीय संकल्पनांचा परिचय, १६) प्रतिभावंत लोकलेखक अण्णा भाऊ साठे, १७) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारी ध्येयवाद.
: कोश लेखन : ‘राज्यशास्त्र व्याख्याकोश’ या कोशाचे लेखन केले आहे.
: संपादित ग्रंथ :
१) बसवेश्वर वचन साहित्य २) महिला विकास प्रश्न-पैलू-प्रयास ३) परिवर्तनवादी चळवळी ४) मानवी हक्क ५) महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाड्या व भवितव्य ६) राजकीय सिद्धांताची रूपरेषा ७) प्रबोधनाचे प्रेरणास्रोत
त्रैमासिक संपादन कार्य : शोध संपदा या संशोधन त्रैमासिकाचे संपादक म्हणून कार्य.
व्याख्याने : महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्यात विविध विषयावर चार हजारांपेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत.
इतर लेखन : विविध वर्तमानपत्रातून व नियतकालिकांतून वैचारिक व सामाजिक विषयावरील सदरांचे विपूल प्रमाणात लेखन केले आहे.
: विशेष :
१) महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य म्हणून कार्य.
२) सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मानवविज्ञान विद्याशाखेवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून इ.स.२०२७ पर्यंत नियुक्ती.
३) नांदेड, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, कोल्हापूर येथील विद्यापीठांच्या विविध विषयांच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून अनेक पुस्तकांचा समावेश.
४) लोकभूमी प्रतिष्ठान,लातूर आणि लोकप्रबोधन संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, अमरावती या दोन संस्थांचा विद्यमान सचिव.
५) विचारशलाका या त्रैमासिकाचे संपादक मंडळ सदस्य