गंगेच्या धारा

Duration: Unlimited
Book Pages: 136

E-Book Price:
₹ 23 ₹ 49 (53% Off)

E-Book Buy Date:
--
E-Book Expiry Date:
--
Audio Buy Date:
--
Audio Expiry Date:
--

   
         

   

       
माझ्या मनातील भावना, विचार हे सर्वांपर्यंत पोहोचवावे असं माझ्या मनात आले आणि मी त्या भावना कागदावर लिहीत गेले कवितांच्या स्वरूपात. माझ्या आईचे नाव श्रीमती गंगाबाई वलांडे या कवितेत तिच्या भावना लिहिल्या आहेत. म्हणून काव्यसंग्रहाचे नाव गंगेच्या धारा असे दिले आहे.
आज माझ्या तिसऱ्या काव्यसंग्रहाचं मनोगत तुम्हा रसिकांसमोर मांडताना मला अतिशय आनंद होत आहे.
म. साहित्य संस्कृती मंडळ, पुणे यांचे सदस्य मा. श्री. धनंजय गुडसूरकर यांची सुंदर प्रस्तावना लाभली आहे. काव्यसंग्रहाची पाठराखण कोकणातील दापोलीच्या प्रसिद्ध साहित्यिका सौ. रेखा जेगरकल यांनी केली आहे. या दोघांचेही मनापासून खूप आभार. 
यापूर्वी हा पहिला काव्यसंग्रह प्रतिभेचे तारे 2 ऑक्टोबर 1994 ला प्रकाशित झाला. त्याला कै. श्री. ना. य. डोळे यांची प्रस्तावना होती. मा. श्री. लक्ष्मीकांत तांबोळी सरांच्या हस्ते प्रकाशित झाला होता. दुसरा काव्यसंग्रह मंगल गाणी दंगल गाणी म. रा. साहित्य संस्कृती मंडळ, पुणे यांचे सदस्य मा. श्री. धनंजयजी गुडसुरकर यांची प्रस्तावना होती. बालसाहित्यातील प्रायोगिक साहित्यिक मा. श्री. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते प्रकाशित झाला. अ. भा. बालकुमार साहित्य परिषद पुणे येथील  डॉ. संगीता बर्वे यांची पाठराखण लाभली माझ्या ओंजळ कवितांची, शब्दगंध या दोन संपादित काव्यसंग्रहात कविता आहेत.
माझ्या कुटुंबातील माझे पती श्री. टी. व्ही.(दूरदर्शन) बिरादार, माझी मुले प्रवीण, प्रमोद तसेच स्नुषा सौ. शोभा व सौ. नीता. माझी मुलगी सौ. प्रतिभा व जावई श्री. डॉ. अशोककुमार देवंगरे तसेच माझी नातवंडे कु. अनुजा, आदिती, सानवी, चि. विघ्नेश, कियांश या सर्वांचे प्रेमाचे, मायेचे पाठबळ होते म्हणून माझा हा लेखन प्रपंच करता आला. 
माझ्या सासरचा बिरादार परिवार, भातांब्रे परिवार, माहेरचा शेटे परिवार, बहिणीचा मुदगडे परिवार, देवांग्रे परिवार आजोळचा वलांडे परिवार सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद पाठीशी होत्या.
मला निवर्गीताई साहित्य सखी ग्रुपचे तसेच सौ. रेखाताई जेगरकल, अभंग शिकविणाऱ्या सौ स्मिताताई पेशवे, मधुसिंधूच्या रचनाकार सौ. माधुरीताई काकडे, षडाक्षरी शिकविणाऱ्या सौ. वत्सलाताई पवार सर्वांचे मार्गदर्शन लाभले. त्या सर्वांचे मनापासून आभार मानते.
आमच्या शाळेतील श्री. जावरेसर, श्री. मुरुळेसर, श्री. कांबळेसर, श्री. नामदेवसर, श्री. साखरेसर यांचेही सहकार्य लाभले. शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व कर्मचाऱ्यांच्या शुभेच्छा पाठीशी आहेत.
प्रभाकर पब्लिकेशन यांनी कमी वेळात उत्कृष्ट छपाई, रोहित टायपिंग सेंटर यांनी अक्षराची जुळवणी, विरभद्र गुळवे सरांनी उत्कृष्ट मुखपृष्ट करून दिले. सर्वांचे मनापासून आभार.
माझा हा काव्यसंग्रह तुम्ही सूज्ञ रसिकांनी गोड मानून घ्यावा..

नाव - सौ. मंगला शेटे बिरादार उदगीर
शिक्षण - बी. ए. बी. एड.
अनुभव - संग्राम स्मा. विद्यालय उदगीर स. शि. 27 वर्षे
प्राचार्या - लोणेश्वर मा. उ. मा. विद्यालय (औ. व.) लोणी.
अध्यक्षा - महेश शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर
            - भारत स्का/गा. प्रशिक्षण आयुक्त (गाईड),   
            - भारत स्का/गा. राज्य कार्यकारिणी सदस्या, 
            - प्रबोधन साहित्य परिषदेत पदाधिकारी.
* दिवाळी अंक, वर्तमानपत्रात कविता प्रकाशित  
* विविध कवी संमेलने व साहित्य संमेलनात सहभाग.
* साहित्य दरबार मध्ये सातत्याने लेखन      
* प्रतिलिपिवर कविता लिखाण.
* शब्दांगार साहित्य चळवळ हिंगोली तर्फे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार.
* मधुसिंधू जमकर काव्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट काव्य पुरस्कार.
* मधुदीप, मधुसिंधू काव्य रचनेला अनेक प्रमाणपत्र.

0

Average Rating

0%Recommended

Submit Your Review

Product

Research...

₹ 39 ₹ 50
Product
Product
Product
Product

मला...

₹ 20 ₹ 40
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product