अभिजात संगीत प्रवर्तक (गायन, वादन व नृत्यातील 51 चरित्रे)

Duration: Unlimited
Book Pages: 176

E-Book Price:
₹ 35 ₹ 60 (42% Off)

E-Book Buy Date:
--
E-Book Expiry Date:
--
Audio Buy Date:
--
Audio Expiry Date:
--

   
         

   

       

इयत्ता नववी ते एम.ए. संगीत तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या विविध परीक्षांसाठी उपयुक्त. 

अभिजात संगीत प्रवर्तक
(गायन, वादन व नृत्यातील 51 चरित्रे)

 

डॉ. संदीपान गुरुनाथ जगदाळे

Paper back
ISBN - 978-93-92464-57-7
E-Book
ISBN - 978-93-92464-60-7

First Edition - 30 मे 2023

 

‘अभिजात संगीत प्रवर्तक' हा माझा 17 वा ग्रंथ संगीत साधकांच्या हाती देताना मला अत्यानंद होत आहे. इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मागील 23 वर्षांपासून संगीत विषयाचे अध्यापन करत असताना अनेक सांगीतिक कलावंताच्या कार्याचा जवळून परिचय झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेले कार्य निश्चितच डोळे दिपवणारे होते. त्यांच्या कार्यातून ऊर्जा व प्रेरणा मिळत होती. अध्यापन करत असताना मी निश्चय केला आहे की ज्या अभिजात संगीत प्रवर्तकांनी संगीतासाठी मोलाचे योगदान दिले अशा महान कलावंतांच्या जीवन चरित्रांचा संग्रह करावा व ग्रंथरुपाने संगीत साधकांच्या सेवेत अर्पण करावा. 
पाहता पाहता गायन, वादन व नृत्य क्षेत्रातील 51 कलावंतांचे जीवन चरित्र संकलित केले. ती जीवन चरित्रे या ग्रंथरूपाने आज आपल्यासमोर ठेवत आहे. इयत्ता नववी ते बारावी संगीत विषय, विविध विद्यापीठांच्या बीए ते एम.ए. संगीत विषयासाठी तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या विविध परीक्षांसाठी या ग्रंथाचा लाभ होणार आहे. 
या ग्रंथ लेखनासाठी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.लक्ष्मीरमणजी लाहोटी, सरचिटणीस मा.रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन व समस्त संचालक मंडळ यांनी वेळोवेळी प्रेरणा दिली त्याबद्दल मी अंत:करणपूर्वक आभार मानतो. हा ग्रंथ दर्जेदार व्हावा यासाठी नेहमीप्रमाणे प्रोत्साहन देणारे कार्यकुशल प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ.प्रशांत मान्नीकर, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे, संगीत विभाग प्रमुख डॉ.देवेंद्र कुलकर्णी व कार्यालयीन अधीक्षक रुपचंद कुरे यांनी वेळोवेळी बहुमोल मार्गदर्शन केले त्याबददल त्यांचेही मी ऋण व्यक्त करतो. या ग्रंथासाठी आकर्षक मुखपृष्ठ करून दिल्याबद्दल श्री शिवाजी हांडे यांचे मनापासून आभार तसेच श्री विरभद्र गुळवे यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार.
संगीताचे अध्यापन करणारे सर्व गुरुजन, सांगीतिक परीक्षा देणारे विद्यार्थी याबरोबरच संगीताचे जाण असणाऱ्या रसिक श्रोत्यांना हिमालया एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या थोर अभिजात संगीत प्रवर्तकांचा निश्चितच जवळून परिचय होईल व त्यांच्या प्रेरणेतून भारतीय अभिजात संगीताला एक योग्य दिशा मिळेल यात शंका नाही. माझ्या इतर ग्रंथांप्रमाणे याही ग्रंथांचे आपण स्वागत कराल असा आशावाद बाळगतो.
डॉ. संदीपान गुरुनाथ जगदाळे
  • sandeepjagdale17@gmail.com
  • Latur

प्रा.डॉ.संदिपान गुरुनाथ जगदाळे
पत्ता -

100 साईनाथ, नवीन खाडगाव रोड, लातूर

शिक्षण -

एम.ए. (संगीत), एम. ए. (इंग्रजी), बी.एड., नेट (संगीत), पीएच.डी. (संगीत), संगीत अलंकार, संगीत भास्कर, योग शिक्षक पदविका
सेवा -

1999 पासून दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे संगीत विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत.
 

विशेष निवडी/नियुक्त्या -
1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, राज्यमंडळ सदस्य व निमंत्रक म्हणून कार्य.
2. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ‘अधिसभा (सिनेट) सदस्य' म्हणून कार्य.
3. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे संगीत अभ्यासमंडळ सदस्य म्हणून कार्य.
4. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे येथे भारतीय संगीत अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्य.


ग्रंथ लेखन -
1. तालगंध भाग - 1 
2. तालगंध भाग - 2
3. तालस्पर्श भाग - 1 
4. तालस्पर्श भाग - 2 
5. सुरेल इतिहासाची सोनेरी पाने
या सह 19 ग्रंथांचे लेखन.
यातील काही ग्रंथ ‘अमेरिका व कॅनडा' या देशात पोहोंचली आहेत.

0

Average Rating

0%Recommended

Submit Your Review

Product

Research...

₹ 39 ₹ 50
Product
Product
Product
Product

मला...

₹ 20 ₹ 40
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product