संगीत प्रकाश (क्यू आर कोड सह)
Duration: | Unlimited |
---|---|
Book Pages: | 72 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
संगीत प्रकाश (क्यू आर कोड सह)
लेखक - डॉ. संदीपान गुरुनाथ जगदाळे
Paper back
ISBN - 978-93-92464-56-0
E-Book
ISBN - 978-93-92464-58-4
First Edition - 30 मे 2023
अभिजीत शास्त्रीय संगीत...! भारताने जगाला दिलेल्या अनेक देण्यांपैकी एक महत्त्वपूर्ण देणगी. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांच्या वतीने 2021 पासून इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी ‘भारतीय संगीताचा इतिहास व विकास' या विषयाचे पाठ्यपुस्तक निर्माण केले आहे. हा विषय विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करुन देणारा, व्यक्तिमत्व घडवणारा, जीवनाला एक दिशा देणारा विषय आहे. विद्यार्थी हा विषय आनंदाने शिकत आहेत. परंतु त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा, त्यांचे शिक्षण अत्यंत मनोरंजक पद्धतीने व्हावे, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ व प्रभावी व्हावी या दृष्टिकोनातून या सर्व पाठ्यघटकांवर मी व्हिडिओंची निर्मिती केली. याचे क्यू.आर. कोड निर्माण करुन ते पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातले संगीत विषयाचे हे पहिले पुस्तक आहेत की ज्यातून आता क्यू. आर. कोड च्या माध्यमातून विद्यार्थी अध्यापण करणार आहेत.
या पुस्तकाच्या निर्मितीसाठी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.लक्ष्मीरमणजी लाहोटी, सरचिटणीस मा.रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव मा. सुरेशजी जैन व समस्त संचालक मंडळ यांनी वेळोवेळी प्रेरणा दिली त्याबद्दल मी अंत:करणपूर्वक आभार मानतो. हे पुस्तक दर्जेदार व्हावे यासाठी नेहमीप्रमाणे प्रोत्साहन देणारे कार्यकुशल प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, संगीत विभाग प्रमुख डॉ.देवेंद्र कुलकर्णी व कार्यालयीन अधीक्षक रुपचंद कुरे यांनी वेळोवेळी बहुमोल मार्गदर्शन केले त्याबददल त्यांचेही मी ऋण व्यक्त करतो. या ग्रंथासाठी आकर्षक मुखपृष्ठ करून दिल्याबद्दल श्री शिवाजी हांडे यांचे मनापासून आभार तसेच श्री गुळवे यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन निर्माण करण्यात आलेले हे माझे एकोणिसावे पुस्तक संगीताचे अध्यापन करणारे सर्व गुरुजन, इयत्ता बारावी वर्गातील विद्यार्थी, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या विविध परीक्षा देणारे परीक्षार्थी याबरोबरच रसिक श्रोत्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही. माझ्या इतर ग्रंथांप्रमाणे याही ग्रंथांचे आपण स्वागत कराल असा मला विश्वास आहे.
- sandeepjagdale17@gmail.com
- Latur
प्रा.डॉ.संदिपान गुरुनाथ जगदाळे
पत्ता -
100 साईनाथ, नवीन खाडगाव रोड, लातूर
शिक्षण -
एम.ए. (संगीत), एम. ए. (इंग्रजी), बी.एड., नेट (संगीत), पीएच.डी. (संगीत), संगीत अलंकार, संगीत भास्कर, योग शिक्षक पदविका
सेवा -
1999 पासून दयानंद कला महाविद्यालय, लातूर येथे संगीत विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत.
विशेष निवडी/नियुक्त्या -
1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, राज्यमंडळ सदस्य व निमंत्रक म्हणून कार्य.
2. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ‘अधिसभा (सिनेट) सदस्य' म्हणून कार्य.
3. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे संगीत अभ्यासमंडळ सदस्य म्हणून कार्य.
4. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे येथे भारतीय संगीत अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्य.
ग्रंथ लेखन -
1. तालगंध भाग - 1
2. तालगंध भाग - 2
3. तालस्पर्श भाग - 1
4. तालस्पर्श भाग - 2
5. सुरेल इतिहासाची सोनेरी पाने
या सह 19 ग्रंथांचे लेखन.
यातील काही ग्रंथ ‘अमेरिका व कॅनडा' या देशात पोहोंचली आहेत.