महाकवी हरिहर रचित - बसवराजदेवांचे काव्य (मराठी अनुवाद)

Duration: Unlimited
Book Pages: 160

E-Book Price:
₹ 27 ₹ 50 (46% Off)

E-Book Buy Date:
--
E-Book Expiry Date:
--
Audio Buy Date:
--
Audio Expiry Date:
--

   
         

   

       

महाकवी हरिहर रचित - बसवराजदेवांचे काव्य  (मराठी अनुवाद)  (Mahakavi Harihara's - Basavarajadevanche Kayvya (Marathi Translation)

संपादन : एच.देवीरप्पा (Editor: H. Devirappa)

1. बसवण्णांच्या कार्याची ओळख (Introduction to Basavanna Work) :

  • हरिहर या कवीने ‘बसवराजदेवर रगळे' यात बसवराज म्हणजे महात्मा बसवेश्वर यांना देव मानत त्यांचा जीवन प्रवास काव्यबद्ध केला आहे.

  • हे काव्य ईशस्तवन आहे आणि बसवण्णांच्या जीवनाचा आध्यात्मिक आणि पुराणकथा रूपाने सादरीकरण आहे.

2.  बसवण्णांच्या कार्याचा प्रभाव (Impact of Basavanna Work) :

  • बसवण्णांच्या नंतर अल्प काळात लिहिलेल्या या उत्कट काव्याने महात्मा बसवेश्वरांना एक पौराणिक विभूती आणि अवतार म्हणून लोकमनात विराजमान केले.

  • महात्मा बसवण्णांची ऐतिहासिक क्रांती आणि घडविलेल्या इतिहासाला अवतार कार्याचे स्वरूप प्राप्त झाले.

  • या काव्याच्या आधारावर अनेक बसव पुराणांची रचना झाली.

  • पुढे अनेक बसव पुराणांची रचना याच रगळेच्या आधाराने होत राहिली. महात्मा बसवेश्वरांचा पुराणपुरुष ते ऐतिहासिक पुरुष हा प्रवास समजून घ्यायचा असेल तर प्रथम ‘बसवराजदेवर रगळे' जाणून घेतले पाहिजे, तरच महात्मा बसवण्णांच्या इतिहासाला कसे प्रक्षिप्त केले गेले, याचा पट उलगडू शकतो.

  • या काव्यामुळे बसवण्णांच्या जीवनातील इतिहास कसा प्रकट झाला हे स्पष्ट होते.

3. बसवण्णांचे जीवन महाकाव्य आहे (Epic life of Basavanna) :

  • महात्मा बसवण्णांचे संपूर्ण जीवन हे एक महाकाव्य आहे. मात्र इतिहास काव्यशैलीने गोंदता येत नसतो.

  • ऐतिहासिक महापुरुष असणाऱ्या महात्मा बसवेश्वरांच्या जीवनाला काव्याने शब्दबद्ध करता येईल, परंतु महात्मा बसवण्णांचे संपूर्ण जीवन पुराणपुरुषाच्या साच्यात साचेबद्ध करता येणार नाही.

4. बसवण्णा कवी आणि समाजसुधारक (Basavanna poet and social reformer) :

  • तात्त्विक काव्याचा आविष्कार वचन साहित्यातून करणारे बसवण्णा हे स्वतः महाकवी होते.

  • नवीन समाजाचे, धर्माचे, जीवनपद्धतीचे आणि व्यवस्थेचे निर्माते होते.

  • हरिहराने कल्पना, कथा (दंतकथा) आणि कयास या आधारावर रगळे लिहिली आहेत, असे असले तरी वचन साहित्यानंतर महात्मा बसवण्णा आणि शरणांबद्दलचा एक प्रमुख आणि प्रथम पुराभिलेखीय दस्तऐवज म्हणून बसवराजदेवर रगळेचे महत्त्व नाकारता येऊ शकत नाही.

  • ‘बसवराजदेवर रगळे' याकडे फक्त एक उत्तम काव्य म्हणूनच वाचकांनी पाहिले पाहिजे.

  • कन्नड भाषेतील ‘बसवराजदेवर रगळे' मराठीमध्ये अनुवादित करण्याचे मोठे कठीण काम प्रा.आर.एम.करड्डीगुद्दी यांनी प्रामाणिकपणे व समर्थपणे पार पाडले आहे. रगळेचा शब्दशः अनुवाद करण्याइतकेच काम अनुवादकाने पार पाडले नाही तर चिकित्सकपणे ऐतिहासिक भूमिकेतून वैचारिक भूमी नांगरत ठेवण्यास प्राधान्य दिले आहे.

  • मराठी साहित्याच्या दालनात या अनुवादित ग्रंथाने अधिकची भर पडली आहे.

  • मराठी वाचक व संशोधक यांना या पुस्तकामुळे महात्मा बसवण्णांच्या इतिहासाची तथ्याधारित मांडणी किती आवश्यक आहे, याची जाणीव होईल. यास्तवच शितल खाडे आणि शशिकांत उरगुंडे यांना ‘बसवराजदेवर रगळे' मराठीत प्रकाशित करायचे होते. 

5. हरिहराचे "रगळे" लिहिण्याची पद्धत (Harihara's method of writing "Ragale") :

  • महात्मा हा देवदूत असतो किंवा त्याला देवत्व देऊन त्याच्या क्रांती प्रेरक विचारांना कसे बासणात गुंडाळून ठेवता येते, याचा प्रत्यय ‘बसवराजदेवर रगळे' वाचताना येतो.

  • दंतकथेतील देवत्वाऐवजी महात्मा बसवण्णांनी रुजविलेल्या मनुष्यत्वाकडे आजच्या समाजाने लक्ष दिले पाहिजे, हा धडा हे पुस्तक वाचल्यास शिकता येतो.

  • तार्किकता, तथ्यात्मकता, तात्त्विकता, तटस्थता आणि तरलता या पाच ‘त' कारांना तयार ठेवूनच हरिहर लिखित ‘बसवराजदेवर रगळे' याचे वाचन करावे, तरच इतिहास लेखनात झालेल्या चूका आणि इतिहास लेखनाच्या नव्या दिशा कळू शकतील.

 
No Author
  • --
  • --

महाकवी हरिहर रचित - बसवराजदेवांचे काव्य  (मराठी अनुवाद)

(Mahakavi Harihara's - Basavarajadevanche Kayvya (Marathi Translation)

संपादन : एच.देवीरप्पा (Editor: H. Devirappa)

मराठी अनुवादक : प्रा.आर.एम.करडीगुद्दी (Marathi Translator: Prof. R. M. Kardiguddi)

संपादकीय सहाय्य : शितल खाडे, शशिकांत उरगुंडे (Editorial Assistance: Shital Khade, Shashikant Urgunde)

ISBN 978-93-92464-75-1
© सर्व हक्क संपादकाधीन
प्रथम आवृत्ती - 15 ऑगस्ट 2024
अक्षर जुळवणी - रोहित टायपिंग सेंटर, लातूर
मुखपृष्ठ रेखाटन - विरभद्र गुळवे

0

Average Rating

0%Recommended

Submit Your Review

Product

Research...

₹ 39 ₹ 50
Product
Product
Product
Product

मला...

₹ 20 ₹ 40
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product