शब्दरंग
Duration: | Unlimited |
---|---|
Book Pages: | 128 |
E-Book Price: |
₹ 25
|
---|---|
Physical Book Price: |
₹ 130
|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
शब्दरंग (Shabdrang)
- संपादक -
प्रा.डॉ.नयन भादुले-राजमाने
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर
संपादक मंडळ
विजया भणगे, उषा भोसले, उमा कोल्हे,
प्रा.डॉ.क्रांती मोरे, नीलिमा देशमुख, प्रा.सुलक्षणा सोनवणे,
ॲड.रजनी गिरवलकर, वृषाली पाटील, शैलजा कारंडे
Paper Back
ISBN 978-93-6342-466-1
Ebook
ISBN 978-93-6342-151-6
First Editon : 17 July 2024
‘शब्दांकित साहित्य मंच' या साहित्यिक संस्थेची सुरुवात काही मैत्रिणींनी मिळून 20 वर्षापूर्वी केली. कालांतराने या रोपट्याचे कधी संस्थारूपी वृक्षात रूपांतर झाले हे कळलेच नाही. अनेक साहित्यिक रसिक श्रोते यांनी भरभरून प्रतिसाद दिला. महिन्याच्या प्रत्येक जयंती, पुण्यतिथी, सण-उत्सव अशा प्रकारच्या दिनविशेषानुसार कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते. बैठकी मधले आयोजन कालांतराने शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचले. पुढे राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेण्यापर्यंत मजल पोचली. कोरोना काळात अस्वस्थ मानसिकतेला संजीवनी ठरावी अशा पद्धतीने शब्दांकित साहित्य मंचने ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन केले. या कार्यक्रमांना अगदी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, आंध्र, मराठवाडा इत्यादी ठिकाणाहून प्रतिसाद लाभला. कालांतराने शब्दांकित एक साहित्य चळवळ बनली. त्याही पुढचे पाऊल म्हणजे दूरवर परदेशात वास्तव्य करणारे आपले महाराष्ट्रीयन स्नेही शब्दांकित साहित्य मंचावर यायला उत्सुक आहेत. त्यांचेही स्वागतच आहे.
शब्दांकित साहित्य मंच हे मराठी व हिंदी दोन्ही भाषेतील कार्यक्रमांचे आयोजन करते. ऑनलाइन कार्यक्रमांमध्ये कवी संमेलन, पुस्तकावर बोलू काही, कार्यशाळा, अभिवाचन, चर्चासत्र, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन सोहळा, इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिंदी मध्येही कवी संमेलन, किताबें कुछ कहना चाहती है... अशाप्रकारे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. इत्यादी कार्यक्रम शब्दांकित साहित्य मंच घेत असते.
शब्दांकित साहित्य मंचच्या वतीने प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करताना खूप आनंद होत आहे. नवोदित कवयित्रींना एक चांगली संधी आपलं साहित्य प्रकाशित करण्याची मिळावी तसेच स्वतःच्या कवितांच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात नावारूपाला आलेल्या कवयित्रींच्या सोबत त्यांच्या कविता बहरून याव्यात हा मानस ठेवून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरत आहे. शब्दांकित साहित्य मंचच्या सर्व सदस्यांनी एकमताने या उपक्रमाला होकार दिला. एक काव्यसंग्रह काढावा असे ठरवून कवितांसाठी आवाहन केले आणि कवितांचा पाऊसच पडला जणू. सहभागी कवयित्रींची संख्या पाहता दोन काव्यसंग्रह काढावेत असा विचार झाला आणि रसिकांसमोर ‘शब्दरंग' व ‘भावगंध' या शीर्षकाचे दोन काव्यसंग्रह आम्ही घेऊन येत आहोत.
‘शब्दरंग ' या काव्यसंग्रहास मा. प्रा. किरण सगर सर, उपाध्यक्ष, म.सा.प. केंद्रीय कार्यकारणी, औरंगाबाद यांची महत्वपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. त्यांचे मन:पूर्वक आभार मानते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमती जगताप मॅडम यांचे आशीर्वादरूपी शुभेच्छा लाभल्या आहेत. प्रकाशक विरभद्र गुळवे यांनी हा काव्यसंग्रह प्रकाशित करताना सहकार्य केले. तसेच ई-बुक प्रकाशित करण्यास विनामूल्य सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद मानते. शेवटी या कार्यात ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
- --
- --