आरंभ

Duration: Unlimited
Book Pages: 243

E-Book Price:
₹ 27 ₹ 47 (43% Off)

E-Book Buy Date:
--
E-Book Expiry Date:
--
Audio Buy Date:
--
Audio Expiry Date:
--

   
         

   

       
आपले लेखन प्रकाशित झाल्यानंतर होणाऱ्या आनंदाची तुलना खरं तर कोणत्याच गोष्टीशी करता येत नाही. माझं गाव अगदी तेलंगण सीमाभागावर. गावात मराठी, कानडी व तेलगू बोलणाऱ्यांची संख्या अगदी समान.माझ्या घरात, नातलगात व गावात उच्च शिक्षणाची कुठलीच परंपरा नव्हती. गावातला मी पहिला पदवीधर. आजूबाजूच्या पंचक्रोशीत, गावात लेखनाचा तर विषयच नाही.अशा एका शेतकरी कुटुंबात जगताना माझ शिक्षण व्यवस्थित पूर्ण होईल का नाही याची शाश्वती नव्हती. प्रथम शेतातील कामे व वेळ मिळाल्यास शाळा - कॉलेज अशी आमच्या परिसरातील परिस्थिती. 2002 मध्ये महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात एम.ए.मराठीचे शिक्षण पूर्ण झाले. आर्थिक परिस्थितीमुळे एम.ए.प्रथम वर्षाचे तास पूर्णपणे येथे राहून मला करता आले नाहीत. एम.ए.पूर्ण झाल्यानंतर शैक्षणिक वर्ष 2002-2003 मध्ये श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील मराठी विभागात तासिका तत्वावर रुजू झालो. खर तर पदव्युत्तर शिक्षणाच्या निमित्ताने प्रथमच उदगीरमध्ये आलो होतो. शिक्षण घेत असताना मला जे शैक्षणिक पर्यावरण मिळाले त्यात महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे. सुरुवातीच्या काळात डॉ.यशवंत साधू, डॉ.अरुण प्रभुणे, डॉ.कृष्णचंद्र ज्ञाते,डॉ.राम तोंडारे व डॉ.दिनकरराव कुलकर्णी अशा सर्व 80 ते 90 च्या दशकातील मराठी विषयातील संशोधन मार्गदर्शकाचा सहवास तसेच डॉ.राजकुमार मस्के, डॉ.गंगाधर नामगवळी, डॉ.दीपक चिदरवार व डॉ.रामचंद्र पस्तापुरे यांचे मार्गदर्शन  माझ्यासाठी मोलाचे ठरले.
दि.04/05/2003 मध्ये उदगीर येथून निघणाऱ्या दै.महिला एकजूट यात माझा पहिला लेख प्रकाशित झाला. आरंभ या पुस्तकात एकूण 60 लेख आहेत. त्यातील बहुतांश लेख 2003 ते 2008 दरम्यान विविध वर्तमानपत्र व नियतकालिकातून प्रकाशित झालेले, तर काही लेख अलीकडच्या काळातील पण आहेत.
साहित्य, संत, ग्रंथ,व्यक्तिमत्व विकास, सण, उत्सव, व्यक्ती, कृषी चित्रपट इत्यादी अनेक स्फुट व प्रासंगिक विषयावरचे हे लेख. या लेखामुळेच म.ई.तंगावार हे नाव वाचकापर्यंत पोहोचले. परिचय नसलेली, भेट न झालेली माणसं जेव्हा प्रथम भेटतात तेव्हा मी तंगावार म्हटल्यानंतर म.ई.का असं विचारतात. 
मुळात माझे लेखन ज्या काळात झाले तेव्हा व्हाट्सअप संस्कृती नव्हती. अन्य कुठल्या तंत्रज्ञानाचा वापर मी करत नव्हतो. कारण 2005 पर्यंत फोन, मोबाईल देखील माझ्याकडे नव्हता.
प्रासंगिक व स्फुट लेख लिहिताना माझ्या असे लक्षात आले की, वाचक लेख वाचून प्रतिक्रिया देत नसले तरी काही लेख वाचकांना आवडतात. याचा अनुभव अनेक लेखाच्या संदर्भात मला आला होता.म्हणून आपण व्यक्त झालं पाहिजे या भावनेने  जमेल तसं लिहीत गेलो. त्याचीच फलश्रुती म्हणजे आरंभ हे ई-बुक होय. माझ्या सुरुवातीच्या काळातील तोडके मोडके विचार व चिंतनाचे आपण स्वागत कराल, ही अपेक्षा! त्या त्या काळात माझे लेख प्रकाशित करून मला ऊर्जा देणाऱ्या सर्व संपादकाचे मनःपूर्वक आभार!
म. ई. तंगावार
  • metangawar@gmail.com
  • उदगीर

म. ई. तंगावार

एम.ए. मराठी, नेट, पीएच.डी. बी. जे. सी.टी.सी. प्रवेशिका प्रथम : गायन व तबला


प्रकाशित साहित्य :

१) ग्रंथ : धर्मवीर संग्रामप्पा जीवन व कार्य (तिसरी आवृत्ती), पाऊलखुणा (तिसरी आवृत्ती), जीवनगाणे (तिसरी आवृत्ती), बोध कवितेचा, वेध माणसांचा, विचारवंत जनार्दन वाघमारे, वचनसाहित्य : मराठीतील अनुवाद परंपरा, आधुनिक मराठी वाङ्मयाचा वस्तुनिष्ठ इतिहास व तुझा विसर न व्हावा (स्वलिखित ९ ग्रंथ)

२) संपादक सुंबरान (स्मरणिका) ४० वे मराठवाडा साहित्य संमेलन, उदगीर

३) सहसंपादन : खुरूप : सीमालढा आणि मीमांसा, बसवतत्त्व चिंतन, बसव सिद्धांत, साहित्यसमीक्षा : संदर्भ आणि वाटचाल, मराठी कथात्म साहित्य, आणि महात्मा बसवण्णा, वर्तमानात महात्मा बसवेश्वर, कोविड -१९


विद्यापीठीय (दूरशिक्षण) पदव्युत्तर अभ्यासक्रम लेखन :

वैचारिक साहित्य संकल्पना व स्वरूप, भारतीय व पाश्चात्त्य वैचारिक लेखनाची पूर्वपरंपरा, एकोणिसाव्या शतकातील वैचारिक साहित्य, एकविसाव्या शतकातील वैचारिक साहित्य.

लघुशोध प्रकल्प (यूजीसी) : मराठीत अनुवादित कन्नड वचनसाहित्य


सदर लेखन :

१) तुका म्हणे, दै. यशवंत, ५२ आठवडे ५२ लेख,

२) जीवनगाणे, दै. यशवंत २६ आठवडे २६ लेख,

३) सावित्री वदते, दै. एकमत २८ आठवडे २८ लेख.


साहित्य पुरवणी समन्वयक (विद्यार्थ्यांचे साहित्य) : सहा महिने, आविष्कार पृष्ठ ०६, दे. यशवंत लातूर.


प्रकाशित शोधनिबंध (एकूण ५५) :

योजना, अस्मितादर्श, विचारशलाका, नवभारत, साप्ताहिक साधना, कवितारती, भाषाभान, बसवपथ, माझी मराठी, वैभवशाली मराठवाडा, संपादित ग्रंथ, विशेषांक व साप्ताहिक इ. नियतकालिकातून...

दैनिक :

दै.सकाळ, लोकमत, सामना, तरुण भारत, गावकरी, एकमत, लोकाशा, सुराज्य, लातूर समाचार, गोदातीर समाचार, लोकमन, यशवंत, महिला एकजूट व विमोचन इत्यादी दैनिकातून १५० लेख प्रकाशित.


ब्लॉग लेखन :

विविध विषयावर १४ ब्लॉग प्रकाशित.


शोधनिबंध वाचन :

विद्यापीठ, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात १० शोधनिबंधाचे वाचन.


आकाशवाणी केंद्र :

ऑल इंडिया रेडिओ परभणी आकाशवाणी केंद्रावरून विचार, साहित्य व पर्यावरणाशी निगडित ५२ कार्यक्रम प्रसारित


प्रबोधनात्मक विचार :

व्याख्याने - ५०, मुलाखती - १०, युट्युब - २५


परीक्षक :

तालुका, मराठवाडा, राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरावर निबंध, वक्तृत्त्व व ग्रंथ परीक्षण स्पर्धेचे परीक्षण.

सहभाग :

१. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, राणी दुर्गावती विद्यापीठ जबलपूर (मध्यप्रदेश), उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद (तेलंगण), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व राजश्री शाहू महाविद्यालय (स्वायत), लातूर इत्यादी विद्यापीठातील विविध शैक्षणिक उपक्रमात सहभाग

२. साहित्यसंमेलने, कार्यशाळा, चर्चासत्र व शिबीर

३. वाचनसंस्कृतीशी निगडित विविध उपक्रमात सक्रिय सहभाग


यश / निवड :

१. निमंत्रित सदस्य, मराठी अभ्यास मंडळ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, मराठी अभ्यास मंडळ सदस्य, संगमनेर महाविद्यालय संगमनेर (स्वायत्त)

२. राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक

३. राज्य ग्रंथ निवड समिती शासनमान्य ग्रंथालयाकरिता पाऊलखुणा व जीवनगाणे या दोन ग्रंथाची शिफारस


संयोजक :

राज्यस्तरीय ग्रंथ परीक्षण स्पर्धा (भारत सासणे यांचे ग्रंथ) ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीर निमित्त दै.यशवंत आयोजित एकूण दहा हजार रुपये.


अवगत भाषा :

मराठी, कन्नड, हिंदी, (तेलुगू सामान्य)


ई.- कंटेंट :

वेबसाईट : www.metangawar.com

ब्लॉग : metangawar.blogpost.com

यूट्यूब : m.e.tangawar7997

5

Average Rating

100%Recommended

Submit Your Review

Product

Research...

₹ 39 ₹ 50
Product
Product
Product
Product

मला...

₹ 20 ₹ 40
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product
Product