भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) | Indian Knowledge System | Bhartiy Dnyan Pranali | NEP 2020 IKS eBook
Year/Semester: | 1th Year - |
---|---|
Duration: | Unlimited |
Book Pages: | 208 |
E-Book Price: |
₹ 35
|
---|---|
Physical Book Price: |
₹ 200
|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
भारतीय ज्ञान प्रणाली ही समस्त मानवाच्या, निसर्गाच्या तसेच संपूर्ण अस्तित्वाच्या कल्याणावर आधारित आहे. म्हणून याला मानवीय ज्ञान प्रणाली सुद्धा म्हटले जावू शकते. ही ज्ञान प्रणाली मानवी अस्तित्त्वाच्या सर्व स्तरांवर सुसंवादाने जगण्याची योग्य समज आणि सुस्पष्टता प्रदान करणारी आहे.
भारतीय ज्ञान प्रणाली ही एक विशाल, व्यापक प्रणाली आहे. जी हजारो वर्षापासून विकसित झालेली आहे. जीवनाच्या प्रत्येक अंगाचा विचार भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये करण्यात आलेला आहे. तत्त्वज्ञान, विज्ञान, गणित, खगोलशास्त्र, कला, आरोग्य चिकित्सा इ. अनेक क्षेत्रामध्ये ही ज्ञान प्रणाली व्यापलेली आहे.
भारतीय ज्ञान प्रणाली एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान हस्तांतरीत करण्याची एक पध्दती आहे. वैदिक साहित्य, उपनिषदे, वेद, आणि उपवेद हे भारतीय ज्ञानव्यवस्थेचा पाया आहे. ही ज्ञान प्रणाली निरीक्षण, अनुभव, प्रयोग आणि सखोल विश्लेषणातून विकसित झालेली आहे.
अभ्यासक्रम
1. भारतीय ज्ञान प्रणालीची ओळख
* भारतीय ज्ञान प्रणालीची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये व महत्त्व
* वैदिककालीन शिक्षण संस्था - नालंदा, तक्षशिला, वल्लभी, विक्रमशिला
* शास्त्र - व्युत्पत्ती, व्याप्ती, वैशिष्ट्ये, महत्व
* पुराण - पुराण, उपपुराण
2. भारतीय तत्त्वज्ञान (दर्शनशास्त्र)
* भारतीय तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये
* वर्गीकरण - आस्तिक दर्शन - सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्व मीमांसा व उत्तरमीमांसा
नास्तिक दर्शन - जैन, बौद्ध व चार्वाक
* चार वेद - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद
* पुरूषार्थ - धर्म, अर्थ, काम, मोक्ष
* आश्रमव्यवस्था - ब्रह्मचर्य, ग्रहस्थ, वानप्रस्थ, संन्यास
* वर्णव्यवस्था - ब्राह्मण, क्षत्रिण, वैश्य, शुद्र
3. आयुर्वेद व योगा
* आयुर्वेदाची परंपरा, त्रिदोष, पंचकर्म, आयुर्वेदाचार्य - सुश्रुत, कश्यप, जीवक
* योगा - विविध कालखंडातील योग, योगसूत्रांचे भाग
* ऋतूचर्या - अदानकाल, विसर्गकाल, ऋतूचर्येचे महत्त्व
* दिनचर्या - घटक, महत्त्व
4. विज्ञान व तंत्रज्ञान
* विज्ञान - वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र
* धातूशास्त्र - पुरातनकालीन धातू
* वैमानिकशास्त्र - भारद्वाज ऋषींचे योगदान, विमानांच्या भागांचे कार्य, विमान निर्मितीसाठीचे धातू, रहस्ये, उर्जास्त्रोत, इ.
5. गणित व खगोलशास्त्र
* गणितशास्त्राचे उद्गम
* भारतीय गणितज्ञांचे योगदान - बौद्धायन, पिंगला, आर्यभट्ट, श्रीनिवास रामानुजन
* भारतीय खगोलतज्ञांचे योगदान - आचार्य लगध, भास्कर 1 व 2 वराहमिहीर व इतर
6. नगरनियोजन व वनसंवर्धन
* प्राचीन नगरनियोजनाचे वर्गीकरण, हडप्पा, मोहेंजोदडो, धोलावीरा, लोथल, कालीबंगन, हडप्पा ऱ्हासाची कारणे
* जलव्यवस्थापन - जलअभियंता भगिरथ, जलसंवर्धनाच्या पारंपारिक पद्धती, प्राचीन भारतीय जलव्यवस्थापनाची उदाहरणे
* वनसंवर्धन - विविध ग्रंथातील वनसंवर्धनाचे विचार, प्राचीन कालीन वने, वृक्ष व वनस्पतीची पूजा
7. साहित्य व कला
* व्याकरणात पाणिनींचे योगदान, स्वरविज्ञान
* भाषा - संस्कृत, पालि, अर्धमागधी, प्राकृत
* कला - कलेचे प्रकार
* वास्तुकला - कोणार्क, मोढेरा, लेपाक्षी, तंजावर
* शिल्पकला - अजिंठा, वेरुळ
* शिलालेख - भाषा, उद्देश, काहीं प्रसिद्ध शिलालेख
* चित्रकला - चित्रांच्या शैली, लेण्यांमधील चित्रकला
* नाट्यकला - भरतमुनींचे योगदान - नाट्यशास्त्र, संगीताचा सिद्धांत
8. अर्थव्यवस्था व व्यापार
* प्राचीन भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये
* प्राचीन भारतीय बँकिंग प्रणाली
* कृषी
* वस्त्रोद्योग
* रस्ते व दळणवळण
9. प्रशासन व नीतिशास्त्र
* विविध काळातील प्रशासन व्यवस्था
* वैदिककालीन प्रशासकीय संरचना, प्रशासकीय पदे, सभा व समित्या
* नीतिशास्त्र
* धर्मशास्त्र
* अर्थशास्त्र
भारतीय ज्ञान प्रणाली हे पुस्तक वाचकांच्या सुपूर्त करताना मला अत्यंत आनंद होत आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान प्रणाली हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे. भारत हा देश अंधश्रद्धाळू व गारुड्यांचाच देश नाही तर इथे समृद्धी ज्ञानपरंपरा होती. त्या परंपरेची भारतीयांना आठवण करून देण्यासाठी म्हणून हा विषय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.
ब्रिटिशांचे आपल्या देशात आगमन होण्यापूर्वी आपल्याकडे हजारो वर्षाची समृद्ध अशी एक ज्ञानपरंपरा होती जी ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक नष्ट केली आणि आपल्यावर त्यांची शिक्षण पद्धती थोपली. यामागे त्यांचा भारतीयांना मानसिक दृष्ट्या गुलाम बनवणे हाच हेतू होता. आज आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला आहोत. परंतु पाश्चात संस्कृतीचे गुलाम बनलेले आहोत. जे जे काही चांगलं आहे ते पाश्चात्यांचे आहे असा आपला समज झालेला आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून अशा बऱ्याच गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे जे की आपल्या देशातील समृद्ध ज्ञानपरंपरा, सांस्कृतिक वारसा, विज्ञान तंत्रज्ञानातील समज यांची पाळीमुळे खूप आधी आपल्या देशात रुजलेली होती याची माहिती होण्यासाठी सहाय्यक ठरेल. पाश्चात्य संस्कृतीच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करून तरुणांना आपल्या विशाल व समृद्ध अशा सांस्कृतिक वारशाची ओळख करून देवून त्यांना ज्ञान प्रवाहात आणणे हा या विषया मागचा मूळ उद्देश आहे.

- latur
Prathamesh Parlikar 05-Dec-2024 08:19 am
21-Nov-2024 02:22 am
Dnyandeo Pinjari 18-Nov-2024 03:16 am
null 12-Oct-2024 03:39 am
best book
Ritik Lale 20-Sep-2024 10:43 am