भारतातील धर्म, पंथ आणि तत्वज्ञान NEP-2020 Book
University: | SRTMUN (Swami Ramanand Teerth Marathwada University Nanded) |
---|---|
Course: | B.A |
Year/Semester: | 2nd Year - |
Duration: | 14 Months |
Book Pages: | 144 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|---|
Physical Book Price: |
₹ 220
|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
‘भारतातील धर्म, पंथ आणि तत्वज्ञान’ हा ग्रंथ विद्यापीठ अनुदान आयोगाच्या व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा ग्रंथ उपयुक्त ठरेल. या ग्रंथाची भाषा सुलभ, प्रवाही आणि विद्यार्थी केंद्रित आहे.
भारत हा विविध धर्म, पंथ आणि तत्त्वज्ञानांची भूमी आहे. येथे धर्म आणि तत्त्वज्ञान हे केवळ धार्मिक संकल्पना नसून सामाजिक न्याय, मानवी हक्क, पर्यावरण जागृती, समता व विवेक यांसोबतही जोडले गेले आहेत. या ग्रंथात भारतीय धार्मिक व तात्त्विक परंपरेचा समतोल व सुसंगत आढावा घेतला आहे.
या ग्रंथात वैदिक धर्माचा प्राचीन आध्यात्मिक पाया, जैन व बौद्ध धर्मातील अहिंसक दृष्टिकोन, चार्वाकांचे भौतिकवाद, भक्ती चळवळीतील शैव-वैष्णव, महानुभाव व वारकरी संप्रदाय, लिंगायतांचे समतावादी विचार, सुफींचे प्रेममार्ग व शीख धर्माच्या एकात्मतेचे तत्त्वज्ञान यांचा समावेश आहे. या सर्व संप्रदायांचे तत्त्वज्ञान, आचारधर्म आणि लोकजीवनातील प्रभाव त्रिसूत्री दृष्टिकोनातून विशद करण्यात आला आहे.
प्रत्येक प्रकरणात केवळ विचारांची मांडणीच नव्हे, तर त्या पंथांचे ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक परिणामही अधोरेखित केले आहेत. अभ्यासक, विद्यार्थी, संशोधक आणि जिज्ञासू वाचकांना हे पुस्तक प्रामाणिक मार्गदर्शन करते. या ग्रंथातील माहिती आजच्या काळातील सामाजिक समता आणि धार्मिक सहअस्तित्वाच्या मूल्यांना अधोरेखित करणारी ठरते. विविध धर्म-संप्रदायांचा सन्मान राखत, त्यांची भूमिका व सामाजिक दृष्टिकोन मांडण्याचा सचोटीने प्रयत्न या ग्रंथात करण्यात आला आहे.
अनुक्रमणिका
१. वैदिक धर्म
२. जैन धर्म
३. बौद्ध धर्म
४. चार्वाक तत्त्वज्ञान
५. शैव वैष्णव भक्तीपंथ
६. महानुभाव पंथ
७. वारकरी संप्रदाय
८. लिंगायत संप्रदाय
९. सुफी पंथ
१०. शीख धर्म

- --
- --
भारतातील धर्म, पंथ आणि तत्वज्ञान
: लेखक :
1. डॉ. ओमशिवा विश्वनाथ लिगाडे
2. डॉ. गंगाधर बालाजीराव देशमुख
1. प्रो. डॉ. ओमशिवा विश्वनाथ लिगाडे
शिक्षण - एम.ए. (इतिहास), एम.फिल., पीएच.डी.
अध्यापन - 1998 पासून शिवजागृती महाविद्यालय, नळेगांव, जि. लातूर येथे इतिहास विषयाचे प्राध्यापक व विभागप्रमुख
Recognized P.G. Teacher in History of S.R.T.M.U. Nanded
संशोधन मार्गदर्शक - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
सचिव - मराठवाडा इतिहास परिषद, छ.संभाजीनगर (2017-2019)
अध्यक्ष - इतिहास अभ्यास मंडळ, न्यु मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली.
निमंत्रित सदस्य - इतिहास अभ्यास मंडळ, स्वा.रा.ती.म.वि.नांदेड
सदस्य - विद्या परिषद, स्वा.रा.ती.म.वि.नांदेड
पुरस्कार - उत्कृष्ट सहकेंद्रप्रमुख पुरस्कार, स्वा.रा.ती.म.वि.नांदेड, 2011
* महात्मा जोतिबा फुले राष्ट्रीय शिक्षक सम्मान पुरस्कार, नवी दिल्ली 2014
* नेहरू इंन्टरनॅशनल सोशल अवार्ड, सातारा 2014
* उत्कृष्ठ शोध निबंध पुरस्कार, मराठवाडा इतिहास परिषद (2017)
संशोधन प्रकल्प - स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेड येथे एक लघुशोध प्रकल्प (MRP) कार्य पूर्ण
- ICSSR मुंबई येथे एक लघुशोध प्रकल्प (MRP) कार्य पूर्ण
संशोधन कार्य - 12 संशोधक विद्यार्थ्यांचे पीएच. डी. पदवीचे कार्य पूर्ण व 3 संशोधक विद्यार्थ्यांचे
पीएच. डी. पदवीसाठी संशोधन कार्य चालू.
प्रकाशित ग्रंथ - 19 प्रकाशित ग्रंथातील प्रकरणे - 09 प्रकाशित शोधनिबंध - 141
आजीव सदस्य - All India History Congress New Delhi आखिल महाराष्ट्र इतिहास परिषद मुंबई, मराठवाडा इतिहास परिषद छ.संभाजीनगर, डेक्कन ऑर्कियालॉजीकल अँड कल्चरल रिसर्च इन्स्टिटयूट हैद्राबाद, संशोधक (त्रैमासिक) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धूळे
इतर - आठशेहून अधिक नाण्यांचा संग्रह
2. डॉ. गंगाधर बालाजीराव देशमुख
सहाय्यक प्राध्यापक (इतिहास विभाग)
वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय, देगलूर. जि. नांदेड.
शिक्षण : एम. ए.(इतिहास), बी.एड ,सेट, नेट, पीएच.डी.
अध्यापन : 2023 पासून वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय, देगलूर ता. देगलूर जि. नांदेड. येथे इतिहास विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत.
सदस्य : 1) अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद मुंबई.(आजीव सभासद)
2) मराठवाडा इतिहास परिषद संभाजीनगर.(आजीव सभासद)
संशोधन प्रकल्प : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. येथे एक लघूशोध प्रकल्प (चठझ) कार्य चालू.
प्रकाशित शोधनिबंध : 20.
इतर : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य विद्यापीठ स्तरावरील परिषद, परिसंवाद, कार्यशाळा यात सहभाग घेऊन शोध निबंधाचे वाचन